India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बालकांसाठी आता मनोदर्पण

India Darpan by India Darpan
July 22, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
0

मानसिक समस्या निवारणासाठी वेबपेज आणि हेल्पलाईन

अकोला ः  केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’  यांनी आज रोजी नवी दिल्लीतील ‘मनोदर्पण’ वेबपेज आणि राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइनचा शुभारंभ केला. यावेळी मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे, उच्च शिक्षण विभाग आणि शालेय  शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिवासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोविड-१९ या वैश्विक महामारीमुळे आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.  बाल्य व किशोर अवस्थेतील मुले अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यांच्यामध्ये अत्याधिक ताणतणाव, चिंता आणि भीती निर्माण होवू शकते. यासाठी त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी व त्यावर त्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी केन्द्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने ‘मनोदर्पण’ वेबपेज आणि टोल-फ्री हेल्पलाइनची सुरुवात केली.

विद्यार्थ्यांच्या  मानसिक स्वास्थ व कल्याणासाठी ‘मनोदर्पण’या वेबपेजच्या माध्यामातून त्यांच्या मानसिक व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी एक समिती तयार करण्यात आली असून त्यात शिक्षण क्षेत्रातील तसेच मानसिक स्वास्थ व मनोविकार तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती विद्यार्थ्यांतील सामाजिक स्वास्थ्याशी संबंधित समस्यांवर लक्ष देईल. त्यांना मार्गदर्शन, ऑनलाईन संसाधन आणि हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांना सामाजिक व मानसिक स्वास्थ्यावर समाधान करण्यासाठी सहाय्यता करतील.

असे आहे ‘मनोदर्पण’

  • शाळा व विद्यापीठातील शिक्षक तसेच विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीना मार्गदर्शन करुन त्यांना दिशानिर्देश देणे.
  • मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वेबसाइटवर वेबपृष्ठ, मनोविकारासंबंधी मदतीसाठी विमर्श, व्यावहारीक टिप्स, पोस्टर, व्हिडिओ यांच्या माध्यामातून काय करावे आणि काय करू नये तसेच वारंवार पडणारे प्रश्न ऑनलाईन सोडविणे.
  • शाळा आणि विद्यापिठ स्तरावरील तसेच राष्ट्रीय स्तरावरील डेटाबेस आणि मार्गदर्शक सेवा  नॅशनल हेल्पलाइन व टेलिफोन काउंसलिंग सेवेव्दारे स्वइच्छने देवू शकतात.
  • एमएचआरडी द्वारे शाळा, विद्यापीठे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलाइन सेवा आहे. ही हेल्पलाइन अनुभूवी तंज्ञाचा तसेच मनोवैज्ञानिक आणि इतर आरोग्य सेवेचा व  इतर व्यावसायिकांच्या एका गटाद्वारे संचालित व नियंत्रित केली जावू शकते. आणि ही हेल्पलाईन कोविड -१९ च्या घटनेनंतरही चालू राहील.
  • मनोसामाजिक सहाय्यता हॅन्डबुक, विद्यार्थ्यांचे जीवन कौशल्य आणि संस्कृतीची ऑनलाइन प्रकाशित केली जाते.  या पुस्तकाव्दारे एफएक्यू तथ्य आणि कोविड -१९ च्या महामारीनंतर भावनात्मक आणि व्यवहार संबंधी लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंतच्या समस्या आणि साधनांचा समावेश आहे.
  • मनोवैज्ञानिक आणि इतर आरोग्य व्यावसायिकांचा संपर्क, कौन्सिलिंग आणि शिक्षणाकरिता इंटरनेक्टिव ऑनलाईन चॅट प्लेटफॉर्म, जो विद्यार्थीं, शिक्षक आणि कुटूंबियांना कोविड -१९  च्या दरम्यान आणि त्यानंतर उपलब्ध होईल.
  • वेबपेज अतिरिक्त संसाधन सामग्री वेबिनार, व्हिडिओ, पोस्टर,फ्लायर्स, कॉमिक्स आणि छोट्या चित्रपटांमध्ये ऑडिओ-विजुअल अपलोड करण्यात येईल.  या माध्यमातून संपूर्ण देशभरातील वर्गातील विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.
  • कोविड १९ च्या प्रकोप नंतर भारत अर्थव्यवस्था पुनर्जीवित करण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान प्रधानमंत्री यांनी सुरु केले आहे. मानसिक स्वास्थ व कल्याणासाठी भाग म्हणून ‘मनोदर्पण’ याचा अभियानात समावेश केला आहे.


Previous Post

मालधक्का त्वरीत बोरगांव मंजू येथे स्थलांतरीत करा

Next Post

बुलडाण्यात २१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन

Next Post

बुलडाण्यात २१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group