बापरे! २ वर्षांची चिमुरडी १२व्या मजल्यावरून पडली अन् (व्हिडीओ व्हायरल)

व्हिएतनाम – परमेश्वर ज्याच्या सोबत असेल त्याचा गंभीर अपघात झाला तरीही काय फरक पडणार आहेपरमेश्वर कुठल्या ना कुठल्या रुपात त्याच्या मदतीसाठी धावून जातोचयावर विश्वास बसत नसेल तर व्हिएतनामची बातमी एेकून तुम्ही थक्क व्हालकारण १२ मजल्यावरून पडलेली एक दोन वर्षांची चिमुकली थेट डिलीव्हरी बॉयच्या हातात जाऊन पडल्याची घटना व्हिएतनाममध्ये घडली.
द डेली मेल आणि स्थानिक वर्तमानपत्रांनी दिलेल्या बातम्यांनुसार या घटनेची आता जगभरात चर्चा होत आहेव्हिएतनाममधील हनोई येथील ही घटना आहेसामानाची डिलीव्हरी द्यायला एक तरुण ट्रकमध्ये बसून एका बिल्डींगच्या बाहेर उभा होतातो डिलीव्हरीसाठी प्रतिक्षा करीत होतात्यातच त्याने बघितले की एक दोन वर्षांची चिमुकली बालकनीच्या कोपऱ्यावर लटकलेली आहेतो तातडीने गाडीतून उतरला आणि धावत सुटलावर जावे की खाली थांबावे त्याला सुचत नव्हतेतेवढ्यात मुलाचा हात सुटला
त्याचवेळात डिलीव्हरी बॉय एका छतावर चढलातो अश्याठिकाणी चढला की जर मुलगी पडली तर तिला पकडता येऊ शकेलजगभर व्हायरल झालेल्या व्हिडीयोमध्ये मुलीची आई जोरजोराने ओरडताना व रडताना दिसत आहेतिच्या डोळ्यापुढे मुलगी बालकनीतून खाली पडत होतीमात्र डिलीव्हरी बॉय परमेश्वरासारखा धावून आला आणि त्याने मुलीला पकडून घेतले.
 हा व्हिडीयो लाखो लोकांनी आतापर्यंत बघितला आहेमुलीच्या तोंडातून काही वेळ रक्त आलेत्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आलेडिलीव्हरी बॉयच्या हातालाही थोडी दुखापत झाली आहेजेव्हा घटना घडली तेव्हा मी फार विचार केला नाही
मुलीला बघितले तेव्हा माझ्या मनात सर्वांत पहिले माझ्या स्वतःच्या मुलीचा विचार आलातिचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे होतात्याच प्रेरणेतून मी धावत गेलो आणि मुलीला वाचवलेपण हे सगळे एक मिनीटाच्या आत झालेले आहेज्यावेळी मुलगी माझ्या हातात होती तेव्हा आपण इथपर्यंत कसा पोहोचलोछत कसा पडतू शकतोयावर विश्वासच बसत नव्हताअसे डिलीव्हरी बॉय म्हणाला.
बघा व्हिडिओ