Last updated on August 6th, 2020 at 10:14 am
नाशिक – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाशकात रक्षाबंधन साजरे केले. शिरपूर येथून मुंबईकडे जात असताना ते नाशिकमध्ये काही वेळ थांबले. आमदार सीमा हिरे यांनी त्यांना राखी बांधली. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. सुशांत राजपूत प्रकरणावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. तर, राममंदिराचे ई भूमीपूजन करणे अयोग्य असल्याची टीकाही त्यांनी केली. भूमीपूजन समारंभास जाण्याची इच्छा आहे. पण, ते शक्य नाही, असेही ते म्हणाले.