India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

प्राप्तीकरदात्यांसाठी ‘फेसलेस‘ फॉर्म

India Darpan by India Darpan
July 26, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्‍ली ः प्राप्तीकरदात्यांना आपल्या आयकर विवरण पत्राचे ई-फाईल योग्यप्रकारे करता  यावे, यासाठी प्राप्तीकर खात्याने नवीन 26 एएस फॉर्म जारी केला आहे. हा फॉर्म जमा करताना कोठेही व्यक्तिगत पातळीवर उपस्थित राहण्याची करदात्यांना आवश्यकता भासणार नाही, असे या फॉर्मचे ‘फेसलेस’ स्वरूप ठेवण्यात आले आहे. या नवीन प्राप्तीकर मूल्यमापन वर्षापासून करदात्यांना सुधारित फॉर्म 26एएस उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये करदात्यांच्या आर्थिक व्यवहारांचे काही अतिरिक्त तपशील तसेच वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कशा प्रकारे देवाण-घेवाणीचे व्यवहार झाले (एसएफटी), याचे विवरण द्यावे लागणार आहे.

प्राप्तीकर विभागामार्फत एसएफटीव्दारे देण्यात आलेली माहिती ऐच्छिक अनुपालन, कराचे उत्तरदायित्व आणि ई-फायलिंग सुलभता यांचा विचार करून फॉर्म 26एएस च्या ‘ई’ भागामध्ये दर्शविण्यात येणार आहे. त्यामुळे करदात्याला त्याचा उपयोग अनुकूल वातावरणामध्ये योग्य कर देयक तयार करून आपले प्राप्तीकर विवरण पत्र (आयटीआर) भरणे शक्य होणार आहे. याशिवाय, यामुळे कर प्रशासनामध्ये अधिक पारदर्शकता आणि दायित्व येणार आहे.

यापूर्वीच्या फॉर्म 26एएसमध्ये पॅन म्हणजेच स्थायी खाते क्रमांकांशी संबंधित स्त्रोतांकडून कर वजा करण्याबाबतची तसेच जमा कराची माहिती देण्यात येत होती. याबरोबरच इतर भरण्यात आलेल्या कराचे विवरण, मिळणारा परतावा आणि ‘टीडीएस डिफॉल्ट’ यांच्यासह अतिरिक्त माहिती देण्यात येत होती. आता मात्र करदात्यांनी कोणकोणते मोठे, प्रमुख वित्तीय देवाण-घेवाणीचे व्यवहार केले, याचे स्मरण देण्यासाठी मदत होईल, अशा प्रकारे ‘एसएफटी’ असेल. त्यामुळे प्राप्तीकर विवरण पत्र दाखल करताना करदात्यांना सुविधा होणार असून त्यांच्याकडे सर्व माहिती उपलब्ध असेल.

मोठ्या रकमांची वित्तीय देवाण-घेवाण करणा-या व्यक्तींच्या बाबतीत प्राप्तीकर विभागाने आर्थिक वर्ष 2016 पासूनच आयकर अधिनियम, 1961 मधील कलम 285 बीए अनुसार ‘निर्दिष्ट व्यक्ती‘ असे स्पष्ट करून त्यामध्ये बँका, म्युच्युअल फंड, बाँड जारी करणा-या संस्था आणि रजिस्ट्रार तसेच सब-रजिस्ट्रार अशा व्यक्तींच्याव्दारे जमा करण्यात येणारी रक्कम, बँकेतल्या बचत खात्यातून काढलेली रक्कम, अचल संपत्ती, मालमत्ता यांची खरेदी-विक्री, मुदतीच्या ठेवी, क्रेडिट कार्डने भागवलेली बिले, भाग,कर्जरोखे, परकीय चलन, म्युच्युअल फंडाची खरेदी, शेअर्सची पुन्हा खरेदी, वस्तू आणि सेवा यांच्यासाठी खर्च केलेली रोकड यांच्याविषयीची माहिती घेतली जात होतीच. आता विविध ‘एसएफटी’अंतर्गत याच प्रकारची सर्व माहिती नवीन फॉर्म 26एएस मध्ये दाखवावी लागेल, असे प्राप्तीकर खात्याने स्पष्ट केले आहे.

करदात्यांसाठी फॉर्म 26एएस मधल्या ‘भाग ई’मध्ये विविध विवरण म्हणजेच कोणत्या पद्धतीने देवाण-घेवाण झाली आहे, हे एसएफटीमध्ये भरणा-याचे (फायलर) नाव, व्यवहाराची तारीख, व्यक्तिगत की संयुक्त पक्ष म्हणून व्यवहार केला आहे, याचा तपशील, व्यवहारामध्ये सहभागी असलेल्यांची संख्या, व्यवहाराची रक्कम, देय दिनांक तसेच रक्कम कशा पद्धतीने दिली-त्याची माहिती आणि तपशील हे नमूद करावे लागणार आहे, असेही खात्याने सांगितले आहे.

यामुळे आपले वित्तीय व्यवहार ‘अपडेट’ ठेवणा-या प्रामाणिक करदात्यांना आपले प्राप्तीकर विवरण पत्र दाखल करतांना मदत होणार आहे. मात्र जे करदाते आपल्या वित्तीय व्यवहारांची नकळत किंवा अनवधानाने  नोंद करीत नाहीत त्यांच्यादृष्टीने हे निराशाजनक आहे. नवीन 26 एएस फॉर्ममध्ये आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये मिळालेल्या व्यवहारांविषयी म्हणजेच वार्षिक माहिती विवरण (एआयआर) असणार आहे.


Previous Post

कॉर्पोरेट सहकार्य

Next Post

स्वदेशी कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु

Next Post

स्वदेशी कोरोना लसीची मानवी चाचणी सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ विस्तार ४० दिवसांनी… खातेवाटप किती दिवसांनी?… १८ मंत्री आगामी काही दिवस बिनखात्याचेच राहणार?

August 10, 2022
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा आजचा रक्षाबंधनाचा दिवस; जाणून घ्या गुरुवार, ११ ऑगस्टचे राशिभविष्य

August 10, 2022

इंडिया दर्पण – हास्य षटकार – यमराज जेव्हा बंट्याच्या स्वप्नात येतात..

August 10, 2022

आज आहे या मान्यवरांचा वाढिदवस – गुरुवार – ११ ऑगस्ट २०२२

August 10, 2022

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री – वृक्षप्रेमाने झपाटलेला कंडक्टर

August 10, 2022

उद्या आहे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा; असे आहे त्याचे महत्त्व

August 10, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group