India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

India Darpan by India Darpan
July 31, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विविध राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात जीवनगौरव पुरस्कारासह अन्य पुरस्कारांचा समावेश आहे. हे पुरस्कार लवकरच प्रदान केले जाणार आहेत. भू प्रणाली विज्ञानाच्या विविध क्षेत्रात प्रख्यात संशोधक आणि अभियंते यांच्या योगदानाला योग्य मान्यता आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच या विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी महिला आणि युवा संशोधकांना प्रोत्साहन देणे हा या मंत्रालयाचा उद्देश आहे.

या वर्षी जीवनगौरव सर्वोत्कृष्टता पुरस्कार प्रा. अशोक साहनी यांना भूरचनाशास्त्र, वर्टेब्रेटपेलियोन्टोलॉजी आणि बायोस्ट्रेटिग्राफी क्षेत्रातल्या लक्षणीय योगदानासाठी देण्यात येत आहे.

महासागर विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विशाखापट्टणम इथल्या सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ. व्ही. व्ही. एस. सरमा, आणि गोव्यातल्या नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चचे संचालक डॉ. एम. रवीचंद्रन यांना देण्यात येत आहे. हिंदी महासागराचे जैवरसायनशास्त्र समजून घेण्यासाठी डॉ. सरमा यांनी लक्षणीय योगदान दिले आहे. डॉ. रवीचंद्रन यांनी भारतीय आर्गो प्रकल्प तयार करण्यासाठी आणि अंमलात आणण्यासाठी आघाडीची भूमिका बजावली आहे तसेच महासागर डाटा एकत्रीकरणाची आणि कार्यान्वित महासागर सेवांसाठी मॉडेलिंगची अंमलबजावणी  केली आहे.

वातावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार तिरुवनंतपुरम इथल्या वैज्ञानिक एसएफ – व्हीएसएससी, डॉ. एस. सुरेशबाबू यांना देण्यात येणार आहे. वातावरणीय स्थिरता आणि हवामानावरील काळ्या कार्बन एरोसोलचा किरणोत्सर्गी प्रभाव जाणून घेण्यासंदर्भात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

भूविज्ञान आणि तंत्रज्ञान यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार वाराणसी इथल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाच्या एन. व्ही. चलपथी राव यांना देण्यात येणार आहे. त्यांनी मांटल पेट्रोलॉजी आणि जियोकेमिस्ट्री यावर संशोधन केले आहे.

महासागर तंत्रज्ञान यासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी चेन्नईच्या महासागर तंत्रज्ञान राष्ट्रीय संस्थेचे संचालक डॉ. एम. ए. आत्मानंद यांची निवड झाली आहे. खोल समुद्र तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी अग्रगण्य कार्य केले आहे.

महिला वैज्ञानिकासाठीचा अन्ना मणी पुरस्कार गोव्याच्या सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञानसंस्थेच्या ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. लीदिता डी. एस. खंडेपारकर यांना प्रदान करण्यात येईल. मरीन बायोफिल्म आणि त्याची महासागरातील समर्पकता यामध्ये त्यांचे लक्षणीय योगदान आहे.

युवा संशोधक पुरस्कार, कानपूरच्या भारतीय तंत्रसंस्थेचे डॉ इंद्र शेखर सेन आणि अहमदाबाद इथल्या फिजिकल रिसर्च लाबोरेटरीचे डॉ अरविंद सिंग यांना पृथ्वी प्रणाली विज्ञान या क्षेत्रातल्या लक्षणीय योगदानासाठी देण्यात येणार आहे.


Previous Post

आदिवासी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सर्वंकष डिजिटायझेशन मोहीम

Next Post

८०० मेगावाॅट क्षमतेचे तीन पवनऊर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित

Next Post

८०० मेगावाॅट क्षमतेचे तीन पवनऊर्जा प्रकल्प राष्ट्राला समर्पित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group