व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पिंपळनेर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट; शेतपिकांचे मोठे नुकसान

India Darpan by India Darpan
September 5, 2020 | 8:31 am
in राज्य
0
वादळी वाऱ्यामुळे उद्धवस्त झालेले मक्याचे पिक

वादळी वाऱ्यामुळे उद्धवस्त झालेले मक्याचे पिक


अक्षय कोठावदे, (पिंपळनेर, ता. साक्री)

शुक्रवारी दुपारच्या सुमारास पिंपळनेर परिसराला मुसळधार पाऊस, वारा आणि गारपिटीने झोडपले असून शेतपिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. उंभरे परिसरात काही भागामध्ये जोरदार पाऊस व गारपिटीमुळे शेती पिक अक्षरशः वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

परिसरातील मक्याचे पिक वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः आडवे झाले आहे. ऊंभरे येथील शेतकरी बाबूलाल सुकदेव अहिरे यांचे ३ एकर कापसाचे पिक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. हे नुकसान अंदाजे साडेतीन लाखांपेक्षा अधिक असल्याचे अहिरे यांचे म्हणणे आहे. रावसाहेब पाटील या शेतकऱ्याचा साडेतीन एकरावरील मका आणि ऊस उद्ध्वस्त झाला आहे. त्यांचेही नुकसान अंदाजे ४ ते साडेचार लाखांचे आहे. महेश पाटील यांचे ४ एकर डाळींब, मका पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यांचेही अंदाजे ९ ते साडेनऊ लाखांचे नुकसान आहे. परिसरातील इतरही अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाताशी येत असलेले पिकच गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

परिसरात काही शेतातील कांदा चाळही जमीनदोस्त झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. उंबरे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातील काही दुकानांचेही पत्रे उडाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नसून परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


Previous Post

राज्यातील सव्वा दोन कोटी कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण; ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम

Next Post

येवल्यातही शिवसेनेचे जोडे मारो अंदोलन, कंगणाचा केला निषेध

Next Post

येवल्यातही शिवसेनेचे जोडे मारो अंदोलन, कंगणाचा केला निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धक्कादायक…पत्नीचा गळा कापला..मुलाची हत्या केली व नंतर स्वतः केली आत्महत्या….या शिक्षकाने संपवले संपूर्ण कुटुंब

November 29, 2023

राज्य शासनातर्फे लातूर, बुलढाणा, सांगलीत होणार क्रीडा स्पर्धा…क्रीडा मंत्रीनी दिली ही माहिती

November 29, 2023

४१ मजुरांच्या यशस्वी बचाव कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशी व्यक्त केली कृतज्ञता..बघा भावूक पोस्ट

November 29, 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा चार दिवसाचा महाराष्ट्र दौरा…या तारखेला असे आहे कार्यक्रम

November 29, 2023

टी२० सामन्यात भारताचा ऑस्टेलियाने ५ गडी राखून केला पराभव…मालिका जिंकण्याचे स्वप्न तूर्त भंगले.. विक्रमही लांबला

November 29, 2023

सुरत जवळ.. सचिन.. रेल्वे स्टेशन? सुनील गावस्करची ही पोस्ट प्रचंड चर्चेत

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.