India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पंडित जसराज यांची नाशिकमधील मैफल हुकली, कारण…

India Darpan by India Darpan
August 18, 2020
in स्थानिक बातम्या
0

आयुष्यात राहून गेलेली एक खंत,
पंडित जसराज जी,सुधीर फडके आणि डॉक्टर विजय भटकर या तिघांचाही नाशिक मध्ये पंचवटीतील स्वामी सरस्वती नंद यांच्या मठातर्फे खाजगीतील सत्कार सोहळा विशेष मोजक्याच निमंत्रितांसाठी आयोजित केलेला होता. सकाळीच अकरा वाजेपासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत वरील तिघांसोबत गप्पा गोष्टी आणि त्यांचा सहवास लाभण्याचा योग घडून आला होता. हा योग सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा असा की पंडितजींचा पूर्वपरिचय असल्यामुळे कदाचित किंवा तसा योग असल्यामुळे पंडितजी संध्याकाळी पाच वाजता मला म्हणाले, ‘नंदेशजी आज शाम को मैफिल जमायेंगे. आप बंदोबस्त की जीएगा’, त्यांच्या उत्स्फूर्त इच्छेमुळे मी खूप आनंदित होऊन मैफिलीची व्यवस्था करण्यासाठी  पुढे सरसावलो.
आणि त्यादिवशी माझे दुर्दैव असे की, माझ्या घरातील लॉन पासून तर ग्रीन व्ह्यू हॉटेल, ताज हॉटेलपर्यंतचे कुठलीही जागा उपलब्ध होऊ शकली नाही. माझी ही सगळी खटपट पंडित जी पाहत होते.
सात वाजेपर्यंत काही होऊ शकले नाही. शेवटी संध्याकाळी साडेसात वाजता माझी असहाय्यता बहुतेक पंडितजींच्या लक्षात आली आणि चहा घेताना ते मला म्हणाले, ‘नंदेशजी जाने दो. फिर कभी नासिक आना हूआ, तो आपके घरमे जरूर मैफिल जमायेंगे’.
अणि ती खंत कायमची राहून गेली.
त्यानंतर ही रुखरुख मी नाशिक मधील माझ्या संगीत प्रेमी मित्रांना बोलून दाखविली. त्यावर प्रत्येकाने प्रतिक्रिया अशी दिली की अरे मला फोन केला असता तर काहीतरी व्यवस्था निश्चित केली असती. बाबूंजी बरोबर बसून पंडित जसराजजींच्या संगीत आविष्काराचा अमृत योग अनुभवता आला असता.
पंडितजींच्या जाण्यामुळे अखेर ती खंत कायमची राहून गेली.
– नंदेश यंदे, उद्योजक


Previous Post

आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट; सोशल नेटवर्कींग फोरमचा उपक्रम

Next Post

दुर्दैव! धरण उशाला कोरड घशाला (पहा व्हिडिओ)

Next Post

दुर्दैव! धरण उशाला कोरड घशाला (पहा व्हिडिओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group