India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नेटरंग – इंटरनेट आणि तंत्रज्ञानाची माहिती देणारे अनोखे सदर

India Darpan by India Darpan
August 28, 2020
in विज्ञान-तंत्रज्ञान-पर्यावरण
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंटरनेट आणि तंत्रज्ञान हे आता सर्वसामान्यांपासून सर्वांच्याच जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहे. मात्र, अनेकदा अज्ञानामुळे अनेक बाबींचा प्रभावी वापर करण्यापासून असंख्य वंचित राहतात. त्या सर्वांसाठी उपयुक्त हे सदर खास ‘इंडिया दर्पण लाईव्ह’च्या वाचकांसाठी…

गूगल मॅप्स

गूगल मॅप्स हे मानवाला मिळालेले वरदान आहे. अगदी अनोळखी प्रदेशात गेलात तरी गूगल मॅप च्या मदतीने हव्या त्या ठिकाणी नेमके पोचू शकता. रस्त्याने जाताना कोणाला विचारात विचारात जाण्याची गरज नाही. या गूगल मॅप मध्ये सतत सुधारणा होत आहे आणि आजपासून दिलेली सुविधा खूपच उपयोगी पडणार आहे. अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे जंगलात वणवे पेटले आहेत आणि हजारो एकरातील वनसंपत्तीचे नुकसान होत आहे. तुम्ही या आगीच्या जवळ राहात असाल तर ही आग कुठवर पोचली आहे, तिचा आपल्याला धोका आहे का , अशी काळजी तुम्हाला नक्की वाटत असेल.

आता काळजीचे कारण नाही. गूगल मॅप वर तुम्ही आगीची माहिती शोधली की Real  Time results तुम्हाला मिळतील. आग ज्या भागात पसरली आहे तो भाग नेमका गूगल मॅप वर दिसेल. तुमच्या घराच्या जवळ तो भाग असला तर सतत अलर्ट येत राहतील. आग जसजशी मागेपुढे होत राहील, तसतसा हा गूगल मॅप तुम्हाला बदलता भाग दाखवत राहील. तुमच्या घराच्या दिशेने जर आग येत असेल तर तुम्हाला वेळीच बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी जायला मदत होईल. ही सोय गेल्या वर्षी फक्त कॅलिफोर्नियाच्या काही भागात उपलब्ध होती. आता ती संपूर्ण अमेरिकेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्हाला हव्या त्या भागाच्या सीमा दिसतील. यामुळे मोठाच फायदा होईल. गूगल मॅप आतापर्यंत फक्त रस्ता दाखविण्याचे काम करायचे , आता तुमचा जीवही वाचवेल.

Whatsapp

प्रत्येक फोनधारकाला Whatsapp वापरणे जणू आवश्यक झाले आहे. जवळच्या लोकांशी संपर्क ठेवण्यापासून ते कार्यालयीन / व्यावसायिक कामापर्यंत सगळ्यांसाठीच Whatsapp आवश्यक आहे. अनेक नवीन फीचर्स Whatsapp लावकारच आणणार आहे. त्यातले एक महत्वाचे फीचर म्हणजे Advanced Search . आपल्याला इतके मेसेज येत असतात की फोन भरून जातो. एखादा मेसेज नेमका कधी आला ते लक्षात राहतेच असे नाही. या सर्च सुविधेमुळे ते सोपे होणार आहे. समाज तुम्हाला एखादा फोटो शोधायचा आहे, लगेच सर्च बारमध्ये त्याचा तपशील द्या, तो फोटो तुमच्या समोर हजर  होईल. हेच विडिओ, documents याबाबतही खरे आहे.

पण थांबा, हे वाचून लगेच शोधायला सुरुवात करू नका. एखादे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याआधी काही निवडक लोकांना उपलब्ध करून दिले जाते. त्यात काही त्रुटी असल्यास हे लोक कंपनीच्या नजरेस आणून देतात. या लोकांना बीटा टेस्टर्स म्हणतात. हे सर्च फीचर आज Whatsapp  ने या लोकांसाठी खुले केले . त्यांचा ओके मिळाला की तुम्हा आम्हाला  मिळेल. थोडी वाट पहा ! Whatsapp एकाच वेळेस चार devices वर वापरण्याची सोयही लवकरच उपलब्ध होणार आहे.

  • नेटकर्मी

 


Previous Post

मिशन झिरो अभियानात मिळाले ५०५५ पॅाझिटिव्ह रुग्ण, बरे होण्याचे प्रमाणही जास्त

Next Post

पर्यूषण काळात मुंबईच्या तीन जैन मंदिरामध्ये प्रार्थना करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Next Post

पर्यूषण काळात मुंबईच्या तीन जैन मंदिरामध्ये प्रार्थना करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023

कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय; अन्य कंपन्याही घेणार?

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group