India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन तर्फे ४०० आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरु

India Darpan by India Darpan
August 21, 2020
in संमिश्र वार्ता
2

मुंबई –  नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) महाराष्ट्र राज्य शाखेच्या माध्यमातून राज्यात ४०० आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक सुरु करण्यात आले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते या क्लिनिकचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी  कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांचा सहभाग खूप महत्वाचा असून त्यांच्या माध्यमातूनच हा लढा यशस्वीरीत्या लढविला जात आहे. आतापर्यंत सरकार डॉक्टरांच्या विविध मागण्यांविषयी अनेक सकारात्मक निर्णय घेत आले असून यापुढेही त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

निरोगी राहण्यासाठी शरीरात रोग प्रतिकारकशक्ती खूप गरजेची आहे. याचे महत्व आता लोकांना कळून चुकले आहे. कोरोनासह इतरही आजारांवर हीच प्रतिकारशक्ती महत्वाचा उपाय आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून रोग प्रतिकारशक्ती नैसर्गिकरीत्या  अगदी सहजपणे वाढविता येते असेही टोपे यांनी निमाच्या डॉक्टरांना मार्गदर्शन करतांना सांगितले. यावेळी आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिक विषयीची संपूर्ण माहिती निमा महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. जी.एस.कुळकर्णी, सचिव डॉ. अनिल बाजारे, कोषाध्यक्ष डॉ. भूषण वाणी यांनी दिली आहे. निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकची संकल्पना राबविण्यासाठी पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे संघटनेला एक नवीन ऊर्जा आणि ताकद मिळाली असून त्याबद्दल निमाकडून त्यांचे विशेष आभार यावेळी मानण्यात आले.

 निमा आयुर्वेद इम्युनिटी क्लिनिकच्या संकल्पनेला प्रमुख मार्गदर्शक डॉ विनायक टेम्भूर्णीकर, अध्यक्ष निमा केंद्रीय शाखा, डॉ आशुतोष कुळकर्णी खजिनदार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. इम्युनिटी क्लिनिकला मूर्तरूप देण्यासाठी प्रकल्प प्रमुख म्हणून डॉ. तुषार सूर्यवंशी यांनी काम पाहिले असून प्रकल्पाला महाराष्ट्र कोविड १९ आयुष टास्क फोर्सची मान्यता मिळाली असल्याचे सांगितले आहे. यामध्ये प्रवक्ता निमा महाराष्ट्र, कोषाध्यक्ष, निमा महाराष्ट्र आणि डॉ मनीष जोशी, निमाचे वेबसाईट आणि तांत्रिक प्रमुख यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

इम्युनिटी क्लिनिक चे प्रकल्प समन्वयक म्हणून  महाराष्ट्र  शासन कोविड १९ आयुष  टास्क फोर्सचे सदस्य डॉ.  संजय लोंढे, (अध्यक्ष- निमा मुंबई),  डॉ. शुभा राऊळ (माजी महापौर -बृहन्मुंबई, माजी अध्यक्ष निमा मुंबई वुमन्स फोरम) व डॉ. राजश्री कटके यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. नागरीकांनी प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी या इम्युनिटी क्लिनिकमध्ये जाऊन लाभ घ्यावा असे आवाहन नाशिक निमा अध्यक्ष जयश्री सूर्यवंशी यांनी केले आहे. नाशिकमध्ये रविभुषण सोनवणे, डॉ. परेश डांगे, डॉ. संदीप चिंचोलीकर, डॉ.वैभव दातरंगे यांनी या उपक्रमात महत्त्वपूर्ण सहभाग घेतला आहेत.


Previous Post

मानव-वन्यजीव संघर्ष सोडवायचा कसा?

Next Post

निमा पदाधिका-यांनी केली नवनियुक्त कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे यांच्याबरोबर चर्चा

Next Post

निमा पदाधिका-यांनी केली नवनियुक्त कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे यांच्याबरोबर चर्चा

Comments 2

  1. Jayashree Suryavanshi says:
    3 years ago

    Community demands Immunity

    Reply
  2. वाले says:
    3 years ago

    चांगली बातमी.चांगला निर्णय

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group