धुळे – जिल्ह्यात खासगी रुग्णालयांकडून कोरोना रूग्णांवर उपचार करताना अवाजवी दर आकारले जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्याची दखल अखेर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापन केली आहे. खासगी रुग्णालयांकडून दिल्या जाणाऱ्या बिलांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. विहित दरापेक्षा बील जास्त आकारण्यात येते किंवा कसे याची तपासणी ही पथके करणार आहेत. तसेच खासगी रुग्णालयांनी नमूद अधिसूचना आणि अधिसूचित दर दर्शनी भागावर रुग्णांना आणि नातेवाइकांना दिसतील, अशा ठिकाणी ठळकपणे लावले आहे की नाही याची शहानिशाही या पथकांकडून केली जाणार आहे.