India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दूध भेसळीविरोधात आता मंत्रीच मैदानात; स्वतःच तपासणार नमुने. राज्यभर जोरदार कारवाई सुरू होणार

India Darpan by India Darpan
August 13, 2020
in राज्य
0

मुंबई – दुधातील होणारी भेसळ रोखण्याकरिता दुधाचे नमुने तपासण्याकरिता दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, राज्यमंत्री आणि आयुक्त स्वतः मैदानात उतरणार आहेत. हे सर्व जण स्वतः नमुने तपासणार असून संबंधितांवर कडक कारवाई करणार आहेत.

मी स्वत: मराठवाडा विभागात जाणार असून राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे पश्चिम महाराष्ट्रात दुधाचे नमुने तपासण्याकरिता जातील. तसेच मुंबईसह ठाणे या भागात दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त हे दुधाचे नमुने तपासून दोंषीवर कारवाई करणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली

राज्यातील दुधात होणारी भेसळ विरोधात दुग्धव्यवसाय विकास विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभाग समन्वयाने कारवाई करणार असून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन प्रमाणित नसलेल्या दुधात निळ टाकण्याचे निर्देश केदार यांनी दिले. मंत्रालयातील दालनात दूध भेसळ रोखण्यासंदर्भात करण्यात येत येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेण्याकरिता आयोजित बैठकीत ते बोलत होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पिशवी बंद दुधाच्या मागणीत घट झाली असून हॉटेल, रेस्टॉरंट व मिष्टांन्न निर्मित केंद्र मोठ्या प्रमाणात बंद झाली आहे. परिणामी राज्यातील दुधाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे दुग्धउत्पादक शेतकऱ्यांकडे अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न शासनाने दूध भुकटीच्या स्वरुपात सोडवला. तसेच दुधाची मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखण्याकरिता दुग्ध व्यवसाय विभागाने दक्ष रहावे, असे केदार यांनी सांगितले. राज्यात भेसळयुक्त दुध ग्राहकांना विकले जात असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाच्या विक्रीवरही त्याचा परिणाम होतो. दूध भेसळ रोखल्यास शेतकऱ्यांच्या दूध विक्री हा जोड धंदा किफायतशीर ठरणार असून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार आहे. यासाठी संबधित अधिकाऱ्यांनी दूध भेसळ हा विषय गांभिऱ्याने हाताळावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

मोबाईल व्हॅन अद्ययावत करा

दुग्ध व्यवसाय विभाग आणि अन्न औषध प्रशासन या विभागाद्वारे दूध भेसळ रोखण्याकरिता शासनाकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल व्हॅन अद्ययावत करावे. त्यासाठी लागणारे रसायन तत्काळ उपलब्ध करावे. तंत्रज्ञ व्यक्तीनी प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. राज्यमंत्री भरणे म्हणाले की, दूध भेसळ करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. भविष्यात दूध भेसळ करण्याचे धाडस करणार नाही, अशी कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत दुग्ध व्यवसाय विभागाचे आयुक्त सुमंत भांगे, अन्न व औषध विभागाचे आयुक्त अरुण उन्हाळे, दुग्ध व्यवसाय विभागाचे उपायुक्त एस. आर. सिरपुडकर यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Previous Post

अत्यावश्यक सेवेसाठी पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस सुरु करा; खासदार गोडसे यांची मागणी

Next Post

कोरोना चाचण्यांचे दर घटले; दरांमध्ये तिसऱ्यांदा सुधारणा. प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात

Next Post
प्रातिनिधीक फोटो

कोरोना चाचण्यांचे दर घटले; दरांमध्ये तिसऱ्यांदा सुधारणा. प्रति तपासणी ३०० रुपयांची कपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंबड पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

June 8, 2023

तब्बल ११ दुकाने फोडणारा जेरबंद… नाशिक पोलिसांची कामगिरी… या गुन्ह्यांची उकल

June 8, 2023
प्रातिनिधिक फोटो

मोबाईल चोरणाऱ्यांचा नाशिक पोलिसांनी लावला छडा…. तिघे गजाआड… ४० मोबाईल हस्तगत…

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

अवघ्या १५ वर्षांच्या मुलाने घेतला गळफास… सातपूर परिसरातील घटना

June 8, 2023

रेपो दराबाबत रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा; बघा, तुमचा EMI वाढणार की कमी होणार?

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

नव्या पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांवर काय लिहायचं? शिक्षण विभागाने काढले हे आदेश

June 8, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group