दिंडोरी – भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी असून अनेक फसव्या योजना तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, शेतकरी विरोधी कायदा आणून शेतकऱ्यांचा घात करत आहेत, अशी टीका माकपचे सेक्रेटरी सुनील मालसुरे यांनी केली, दिंडोरी येथे माकपच्या किसान सभेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर जिल्हा सेक्रेटरी सुनिल मालसुरे, डीवायएफआयचे अध्यक्ष इंद्रजित गावित,किसान सभेचे राज्याध्यक्ष किसन गुजर, तालुका सेक्रेटरी रमेश चौधरी, जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाअध्यक्ष लक्षीमीबाई काळे, यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढत आंदोलन केले. या वेळी दिंडोरी कृषीउत्पन्न बाजार समितीच्या पटांगनापासून तर उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत भाजपा सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, यावेळी जिल्हा सेक्रेटरी सुनिल मालसुरे म्हणाले की एका बाजूने राष्ट्रवादाच्या गप्पा हे सरकार मारते तर दुस-या बाजूने आपल्याच राष्ट्रातील जनतेला वेड्यात काढत आहे, शेतकरी विरोधी कायदे करून धनधाडग्या व्यापारी वर्गाला पोसण्यासाठी या सरकारने विडा उचलला आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे सरकार अपयशी ठरले आहे, परदेशातून आलेला पासपोर्ट मार्गे कोरोनाचा फटका रेशनकार्ड धारकाला सहन करावा लागला आहे, या सरकारने अनेकवेळा हमीभावाचे गाजर शेतकऱ्यांना दाखविले, मात्र हमीभाव मिळाला नाही, अच्छे दिनचे स्वप्न दाखवायचे व महागाई वाढवायची, नोटाबंदी च्या नावाखाली काळा पैसा बाहेर काढण्याची घोषणा करायची व जनतेला वेढीस धरायचे असे हुकुमशाही सरकार सध्या संपूर्ण देशाला लाभले आहे, ते जनतेचा भ्रम निरास करत असल्याचे सांगितले. तालुका सेक्रेटरी रमेश चौधरी म्हणाले की आगामी काळात शेतकरी कर्जमाफी, वनजमिनी, शेतजमिनी , घरकुल योजना, वृद्धापकाळ योजना या सारख्या आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला, यावेळी तहसिलदार पंकज पवार यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी देविदास वाघ, समाधान सोमासे, अप्पासाहेब वाटणे, दौलत भोये, योगेश अहिरे, अंबादास सोनावणे, रमेश चतुर, यासह तीन हजार नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.