Last updated on August 24th, 2020 at 01:53 am
इस्लामाबाद – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा कराचीतच असल्याबाबत पुन्हा एकदा घुमजाव केले आहे.
दहशतवादाच्या निधीवर नजर ठेवणारी संस्था एफएटीएफच्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर येण्यासाठी पाकने ८८ अतिरेकी संघटना व त्यांच्या म्होरक्यांवर कारवाईचे ढोंग केले आहे. या यादीतच दाऊदचे नाव आहे. दाऊद हा पाकिस्तानातच असल्याचे भारताने यापूर्वी अनेकदा सांगितले. मात्र, हा दावा खोटा असल्याचे पाकिस्तानने वारंवार म्हटले होते. या यादीत दाऊदचे नाव असतानाही तो कराचीत नसल्याचे पाकिस्तानने एक दिवसातच म्हटले आहे.