India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

दररोज किमान ३०० स्वॅब नमुने तपासणीसाठी घ्या

India Darpan by India Darpan
August 10, 2020
in राज्य
0

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांचे निर्देश

नंदुरबार – कोरोनाची संपर्क साखळी कमी कालावधीत खंडीत करण्यासाठी दररोज किमान ३०० स्वॅब घेण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेने करावा आणि मृत्यूदर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिले.

कोरोनाबाबत आयोजित ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकरी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, नंदुरबार तालुक्यातून १२५, शहादा येथून १०० आणि तळोदा व नवापूर येथून ७० स्वॅब घेण्यात यावेत. ज्येष्ठ नागरिक आणि अतिजोखमीच्या व्यक्तिंमध्ये साधारण लक्षणे आढळल्यास त्वरीत स्वॅब घेवून उपचार सुरू करण्यात यावेत. त्यासाठी मोबाईल टीमचा उपयोग करण्यात यावा. शहरी भागासोबत ग्रामीण भागातूनही स्वॅब नमुने घेण्यासाठी नियोजन करावे.

नवापूरला स्वॅबचे काम सुरू करा

नवापूर येथे स्वॅब नमुने घेण्याचे काम सुरू करण्यात यावे. त्यासाठी जनतेच्या सोईची जागा निश्चित करण्यात यावी. तसेच कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत प्राथमिक तयारी करण्यात यावी. अक्कलकुवा येथे देखील असे केंद्र सुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. आवश्यकता भासल्यास दोन दिवसात केंद्र सुरू करण्याची तयारी असावी. महिला रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी मनुष्यबळाची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी. रुग्णालयासाठी आवश्यक बाबींची पूर्तता तात्काळ करण्यात यावी. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. महिला रुग्णालयात कोविड बाधितांचे स्थलांतर झाल्यानंतर रक्तपेढी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच जिल्ह्यासाठी २ हजार अँन्टीजन किट्सही प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी उपस्थित होते.


Previous Post

लातूर लॉकडाऊन; १३ ऑगस्टपासून शिथिल तर १७ ऑगस्टपासून मागे घेणार

Next Post

शिवाजी महाराजांचा पुतळा तत्काळ बसवा; कळवण शिवसेनेची मागणी

Next Post

शिवाजी महाराजांचा पुतळा तत्काळ बसवा; कळवण शिवसेनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सटाण्यात महावितरणचा लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात; यासाठी शेतकऱ्याकडे मागितली ३० हजाराची लाच

June 8, 2023

धक्कादायक… प्रेयसीला आधी मिठी मारली… नंतर मेट्रो रेल्वेसमोर तिच्यासह… व्हिडिओ व्हायरल

June 8, 2023

योगींचा मास्टरस्ट्रोक.. आधी माफियांची घरे पाडली… त्यावर हा प्रकल्प उभारला… आता गरिबांना होणार हा फायदा

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशात कोर्टही असुरक्षित… चक्क न्यायाधीशांच्या समोरच कोर्टरुममध्ये माफियाला घातल्या गोळ्या…

June 8, 2023

बिहारमध्ये पूल कोसळला त्याच कंत्राटदाराकडे महाराष्ट्रातील हे काम

June 8, 2023

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बायको आलिया या व्यक्तीच्या प्रेमात? चर्चांना उधाण

June 8, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group