त्र्यंबकेश्वर – रात्रीपासून शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (१३ ऑगस्ट) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालयाच्या प्रांगणातील मोठा वृक्ष उन्मळून पडले. हे झाड चारचाकी वाहनांवर कोसळले. त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. झाड पडल्याचा आवाज इतका मोठा होता की, तहसिल कार्यालयात काम करत असलेले सर्व कर्मचारी व अधिकारी बाहेर धावत आले. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. नगरपालिकेच्यावतीने झाड बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.