शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ठक्कर डोम कोविड सेंटर सेवेत; अत्याधुनिक सोयी-सुविधा मिळणार

by India Darpan
ऑगस्ट 10, 2020 | 1:11 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20200809 WA0013 1

नाशिक – कोविड रूग्णांची वाढती संख्या बघता मुंबई पुण्यासोबत नाशिक शहरात अतिरिक्त बेडची व्यवस्था असावी यासाठी क्रेडाईच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड केअर सेंटर कोरोनाच्या आरोग्य सेवेचे एक आदर्श मॉडेल असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
क्रेडाई आणि नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ठक्कर डोम येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आज पार पडले. त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. हॉस्पिटलमधील बेड्स संपतील तेव्हा या कोविड केअर सेंटरचा वापर करण्यात येईल. बेडची संख्या कमी पडू नये यासाठी अतिरिक्त बेड्स साठी ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती केली गेली आहे.रुग्णांची संख्या कमी कशी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तपासणी अधिक होत असल्याने रुग्णांचा आकडा वाढतो आहे. परंतु कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये यासाठी तपासणी अधिक वाढवून रुग्णांचा शोध घेण्याचे काम सुरूच ठेवावे. कोरोना हे युद्ध असून सर्वांना एकत्र येऊन त्यासाठी लढण्याची आवश्यकता आहे. कोरोना होणारच  नाही याची काळजी सर्वांना घ्यावी, घाबरून जाऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास अजून नवीन ठिकाणी जागा बघून प्राथमिक सुविधा उपलब्ध करून ठेवाव्यात जेणेकरून तेथेही आवश्यकता पडल्यास तातडीने कोविड केअर सेंटर उभारता येणे शक्य होईल. सामाजिक बांधिलकी ठेऊन सर्व संस्था संघटना काम करत आहेत. समाजिक दायित्व  म्हणून हे काम सदैव कायम ठेवण्याचे आवाहनही यावेळी पालकमंत्री भुजबळ यांनी केले.
या आहेत सुविधा
क्रेडाईने तयार केलेलं हे कोविड सेंटर अतिशय उत्कृष्ट बनविले आहे. कोविड केअर सेंटर बनविण्यासाठी चित्रकार तसेच परिश्रम घेतलेल्या सर्वांचे कार्य कौतुकास्पद आहे. रिक्रियेशन कक्षाच्या माध्यमातून विविध खेळ, पुस्तके , टीव्ही, चेस, कॅरम, सेल्फी पॉईंट यासह मनोरंजनाची तसेच रुग्णांना योगा, मेडिटेशनसाठी व्यवस्था करण्यात आल्याने अतिशय उत्तम स्वरूपाचे कोविड केअर सेंटर निर्माण झाले आहे. येथे ५ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आल्याचे क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.
झोपडपट्टीतील संसर्ग कमी
मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, नाशिकच्या स्लम भागात रुग्णांची संख्या कमी झाली असून कंपनीच्या परिसरात तसेच सोसायटी परिसरात रुग्ण आढळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात १२०० पथके काम करत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार देवयानी फरांदे, स्थायी समिती सभापती गणेश गीते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी खासदार समीर भुजबळ, नगरसेवक विलास शिंदे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, नोडल ऑफिसर डॉ. आवेश पलोड, निमाचे शशिकांत जाधव, रंजन ठाकरे, गिरीश पालवे, क्रेडाईचे  जितेंद्र ठक्कर, सुरेश पाटील, सुनील कोतवाल, कुणाल पाटील, गौरव ठक्कर, अनिल आहेर, सचिन बागड, अतुल शिंदे, हंसराज देशमुख, अंजन भालोडिया, नरेंद्र कुलकर्णी,हितेश पोतदार, डॉ.कैलास कमोद आदी उपस्थित होते.
IMG 20200809 WA0014
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वरदान असलेली प्लाझ्मा थेरपी

Next Post

कोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे

Next Post
IMG 20200729 WA0028

कोरोनामुक्तांची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या; दिवसभरात १३,३४८ रुग्ण बरे

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011