नाशिक – नाशिक शहरासह जिल्ह्यात बुधवारी ६३६ नव्या कोरोना बाधितांची भर पडली. त्याचवेळी दिवसभरात ५२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बुधवारी दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा ५४७ झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १२ हजार ८१२ एवढी आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार ३४८ जण उपचार घेत आहेत. नाशिक शहरात उपचार घेत असलेल्यांची संख्या ३ हजार २४० एवढी आहे. तर, ग्रामीण भागात ९३५ जण उपचार घेत आहेत. मालेगाव शहरात सध्या १६९ कोरोना रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १७ हजार ७०७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, नाशिक शहरात बुधवारी ४७४ कोरोना बाधितांची भर पडली आहे. तशी माहिती प्रशासनाने दिली आहे.