श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमध्ये २०० परिचारिकांची ताबडतोब नियुक्ती करण्याचे आदेश नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आहेत. सिन्हा यांनी श्रीनगरमधील रुग्णालयाला भेट दिली असता, तिथे विलगीकरण कक्षात पुरेशा संख्येने परिचारिका उपलब्ध नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने आदेश काढले आहेत.