नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मनोज सिन्हा यांची जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. तत्पूर्वी जी. सी. मुर्मू यांनी नायब राज्यपला पदाचा राजीनामा दिला होता. तो राष्ट्रपतींनी स्विकारला. त्यानंतर सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.