India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

जगातील सर्वोत्तम आरोग्य सेवेचे स्वप्न

India Darpan by India Darpan
July 24, 2020
in संमिश्र वार्ता
0

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उस्मानाबाद येथील  आरटीपीसीआर कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या संकटाने सर्व जग ग्रासले असून या विषाणूची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात १३१ प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या माध्यमातून महाराष्ट्र हे देशातीलच नव्हेतर जगातील सर्वोच्च व  सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य बनविण्याचे स्वप्न असून ते मी बनवणारच असा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ही प्रयोगशाळा उभारण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हात लागले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो तसेच कोविड सारखी संकटे येतात आणि जातात. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी तुम्ही सर्वजण पाय रोवून उभे राहिलात त्यासाठी तुम्हाला मन:पूर्वक धन्यवाद देतो. संपूर्ण राज्यात आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा सुरू करीत आहोत असेही ते म्हणाले.

तसेच कोरोनाचा काळ गेल्यानंतर प्रत्येक प्रयोगशाळेत एक विभाग संशोधनासाठी सुरु ठेवला पाहिजे. कोरोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत: व कुटुंबातील सदस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच  प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्याबरोबरच प्रत्येक गावात कोरोना दक्षता समित्या नेमण्याचे  मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सूचित केले. आपण कितीही प्रयोगशाळा उघडल्या तरी त्या पुऱ्या पडणार नाहीत, त्यामुळे जनतेला सोबत घेऊन व जनतेने  सतत हात धुणे, दोन व्यक्तीमध्ये अंतर ठेवणे व मास्क लावण्यासाठी  जनजागृती करून ते नियम कठोरपणे व कटाक्षाने पाळावे लागतील असे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने यापुढील काळात स्वयंशिस्त पाळली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

हा काळ कोरोना रुग्ण संख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी कारण जोपर्यंत व्हॅक्सिन (औषध) आपल्या हाताशी येत नाही तोपर्यंत आपण विजय मिळवू शकत नसल्याने जनतेला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी आरेाग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, या प्रयोगशाळेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचारी वर्ग हा प्रशिक्षितच असायला हवा. तसेच सर्वांनी मिळून काम केल्यास या प्रयोगशाळेचे उदिष्ट पूर्ण होणार असून आयएमएच्या डॉक्टरांची सेवा घेणे गरजेचे आहे.कारण जिल्ह्यातील मृत्यू दर वाढत असल्यामुळे आवश्यक ती पावले उचलावीत विशेष म्हणजे यापूर्वी तपासणीसाठी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत होते.मात्र आता ही प्रयोगशाळा सर्व प्रकारच्या तपासणीसाठी उपयुक्त असल्याने जिल्हा स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री शंकरराव गडाख म्हणाले, ही प्रयोगशाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी येथील लोकप्रतिनिधी व जनतेची मागणी पूर्ण झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये या प्रयोगशाळेचा जिल्ह्यासाठी  नक्कीच फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले, ही प्रयोगशाळा या विद्यापीठाची दुसरी तपासणी शाळा आहे. मागील महिन्यात या विद्यापीठात १ हजार ७०० नमुने तपासणीची क्षमता असलेली प्रयोगशाळा औरंगाबादमध्ये सुरू केली आहे. हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले असून उद्योजकाकडून त्यासाठी निधी उभा राहिला आहे. येथील प्रयोगशाळेसंदर्भात  विद्यापीठ सिनेट सदस्य प्रस्ताव सादर केला व लॉकडाऊनच्या काळात हे कार्य सर्वांच्या सहकार्याने पार पडले, विषाणूबाबत औरंगाबाद येथे संशोधन सुरू केले असून कोरोनासोबत भविष्यात तोंड देण्यासाठी जैविक विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.


Previous Post

शेतकरी अपघात विमा ः तातडीने प्रकरणे निकाली काढा

Next Post

रिलायन्स साठी घाईघाई, दूरदर्शनसाठी दिरंगाई मागची गोम काय?

Next Post

रिलायन्स साठी घाईघाई, दूरदर्शनसाठी दिरंगाई मागची गोम काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group