India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे

India Darpan by India Darpan
July 26, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली ः चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणा भूषवणार असल्याची  घोषणा   केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीजू आणि हरियाणाचे मुख्य मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आज केली. टोकियो ऑलिम्पिक नंतर या स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे.
हरियाणातल्या पंचकुला इथे या स्पर्धा होणार आहेत. हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग, क्रीडा सचिव रवी मित्तल आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महा संचालक संदीप प्रधान यांच्या उपस्थीतीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे ही घोषणा करण्यात आली. चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे सोपवण्यात आल्याची घोषणा करताना आनंद होत असल्याचे रीजीजू यांनी सांगितले.आपल्या पंतप्रधानांच्या कल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धांमुळे देशातल्या तळापर्यंतच्या कौशल्याचा शोध घेता आला यातून  पुढे आलेल्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हा खेळाचा महाकुंभ आहे. हरियाणाला भक्कम क्रीडा संस्कृती लाभली असून या राज्याने देशाला उत्तम खेळाडू दिले आहेत.

भागीदारीविषयी बोलताना क्रीडा मंत्री म्हणाले की स्टार स्पोर्ट्स  ने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा देशाच्या क्रीडा कॅलेंडरच्या वार्षिक कार्यक्रमात आणल्या आहेत. जेव्हा एखादा युवा खेळाडू स्वतःला राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवर पाहतो तेव्हा केवळ खेळाडूलाच नव्हे तर याचे प्रसारण पाहणाऱ्या इतर युवकांनाही क्रीडा विश्व आपली कारकीर्द घडवण्यासाठीचे क्षेत्र म्हणून स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देत असते.ही भागीदारी सुरु रहात असल्याबद्दल आनंद वाटत असल्याचे ते म्हणाले.

आधीच्या तीन खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत हरीयानाने सातत्याने उत्तम कामगिरी केली आहे. २०१९ आणि २०२०च्या या स्पर्धात राज्याने दुसरे स्थान  (२०० पदके २०२०मध्ये आणि  १५९ पदके २०१९मध्ये ) तर २०१८ मध्ये १०२ पदके (३८सुवर्ण, २६रौप्य, ३८कांस्य) पदकांच्या कमी कमाई सह सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे.


Previous Post

शाखा कार्यालयातही टपाल योजना

Next Post

राष्ट्रीय परीक्षा मंडळात विविध पदांच्या ९० जागा

Next Post

राष्ट्रीय परीक्षा मंडळात विविध पदांच्या ९० जागा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group