India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

चिंताजनक. हिमालायातील ही घटना पर्यावरणासाठी हानिकारक

India Darpan by India Darpan
August 12, 2020
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – हिमालय पर्वत रांगांमध्ये घडणारी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. हिमालयातील भू औष्णिक झऱ्यामधून वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे वातावरणातील तपमान वाढीस मदत होत आहे. ही बाब चिंताजनक आहे.

भूगर्भातून ज्वालामुखीतून बाह्यावतरणात होणारे उत्सर्जन, भूगर्भात होणाऱ्या हालचाली( फौल्ट झोन)आणि भूऔष्णिक व्यवस्थेमुळे जागतिक कार्बन चक्र परिणाम होतो. ज्याचे पृथ्वीवर त्वरित आणि दीर्घकालीन परिणाम होत असतात. हिमालय पर्वतरांगांच्या कुशीत, सुमारे ६०० भूऔष्णिक झरे आहेत, ज्यांचे तापमान आणि रासायनिक स्थितीतही वैविध्य आहे.

कार्बनचक्र आणि त्यामुळे होणारी जागतिक तापमानवाढ याचा विचार करतांना या झऱ्यांची, प्रादेशिक आणि जागतिक हवामान बदलातली  भूमिका आणि भूगर्भातील हालचालींमुळे होणारी वायू उत्सर्जनाची प्रक्रिया यांचाही विचार होणे आवश्यक आहे.

हिमालयातल्या गढवाल प्रदेशात, सुमारे १० हजार चौरस किलोमीटर प्रदेशात हे भूऔष्णिक झरे असून, त्यांच्या पाण्यातून कार्बनडायऑक्साईड चे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत असते. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था, ‘वाडिया  इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी’ ने हे संशोधन केले आहे.त्यांनी याचा सविस्तर अभ्यास करुन या  झऱ्यांमधून वायू उत्सर्जन होत असल्याचे निश्चित केले.  यातून अंदाजे कार्बनडाय ऑक्साईड वायू उत्सर्जन (पाण्यात मिसळला गेलेला वायू मुक्त होणे) चे वार्षिक प्रमाण जवळपास ७.२×१०६ मोल इतके आहे.

वैज्ञानिक प्रकाशन ‘इन्व्हायरोमेंटल सायन्स अँड पोल्युशन रिसर्च’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अध्ययनानुसार, यासंदर्भात, भूऔष्णिक झऱ्यांमधून बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड, हिमालयाच्या गर्भात असलेल्या कार्बोनेट खडकाच्या मेटामोर्फिक डीकार्बोनेशन आणि मॅग्नेशियम तसेच ऑक्सिडेशन ऑफ ग्राफएट, मुळे उत्सर्जित होतो. या भूऔष्णिक पाण्याचे बाष्पीभवन होते आणि त्यामुळे परिणामतः सिलीकाच्या खडकांची झीज होते.आयसो टॉपिक अध्ययनातून हे ही स्पष्ट झाले आहे,  भू औष्णिक जलातील उल्कापाताच्या स्त्रोतातून हे घडत  असते.

हिमालयातील गढवाल  भागातल्या २० भूऔष्णिक जलाचे नमुने घेऊन वैज्ञानिकांच्या पथकाने, गोळा केले. पथकाने केलेल्या स्वतंत्र सर्वेक्षणानुसार, या भूऔष्णिक झऱ्यामधून दरवर्षी ७.२ × १०६ मोल कार्बन उत्सर्जन होण्याची शक्यता आहे.  या अध्ययनातून व्यक्त करण्यात आलेल्या जलप्रवाहामधून उत्सर्जित होणारा कार्बनडाय ऑक्साईडमध्ये (अंदाजे १०११/ मोल/प्रतिवर्ष) हिमालयाला आणि जमिनीवर होणाऱ्या ज्वालामुखीला (१०१२ मोल/प्रतिवर्ष) वर उचलण्याची क्षमता आहे. पृथ्वीवरील वातावरणात मिसळणाऱ्या जागतिक कार्बन उत्सर्जनाचे मोजमाप करतांना, अशा कार्बनडाय ऑक्साईडचा हिशेब करणेही आवश्यक असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.


Previous Post

अंतिम वर्षाच्या परीक्षा होण्याची चिन्हे; युजीसीने कोर्टाला हे सांगितले

Next Post

नाशिक कोरोना अपडेट – ५३७ नवे रुग्ण; २३ मृत्यू

Next Post

नाशिक कोरोना अपडेट - ५३७ नवे रुग्ण; २३ मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मालेगाव शहरातील पाणी पुरवठा केंद्रातील सुरक्षा रक्षकाला मारहाण (व्हिडीओ)

August 12, 2022

मनमाड जवळ तरसाच्या हल्ल्यात ३ जण जखमी

August 12, 2022

झिम्बाब्वे मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार तडकाफडकी बदलला; आता याच्याकडे धुरा

August 12, 2022

आता महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत; का? असं काय झालं?

August 12, 2022

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरण आणि मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भात पुणे पोलिसांनी दिला हा अहवाल

August 12, 2022

राज्यातील सर्व कारागृहांमध्ये प्रथमच हे घडले

August 12, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group