पुणे – विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ते कोथरुड येथून निवडून आले आहेत.
दोन कंपन्यांचे संचालकपद तसेच राजारामपुरी पोलिस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात आरोप निश्चित झाल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात पाटील यांनी सादर केली नाही, असा दावा याचिकर्त्यांनी केला आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. याप्रकरणी चौकशी करून १६ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी कोथरूड पोलिसांना दिले आहेत.