India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

घरच्यापेक्षाही चांगलं जेवण मिळतयं…

India Darpan by India Darpan
July 27, 2020
in महत्त्वाच्या बातम्या
0

बार्शीतील रूग्णांची कोविड केअर सेंटरमधील सुविधांबाबत पालकमंत्री भरणे यांना पोचपावती

सोलापूर  : जेवण चांगलं मिळतंय का?….वेळेवर साफ-सफाई होते का?….उपचार व्यवस्थित मिळतात का?…. हो घरच्यापेक्षा जेवण चांगलं आहे….इथं चांगली काळजी घेतली जात आहे…..हा संवाद आहे बार्शीतील छत्रपती शिवाजी महाविद्यालय पॉलिटेक्निक कॉलेजच्या कोविड केअर सेंटरमधील पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि कोरोना रुग्णांमधील.

यावेळी आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अंकित, तहसीलदार डी.एस. कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगदंड आदी उपस्थित होते.

श्री. भरणे यांनी   रविवारी सायंकाळी बार्शीतील कोविड केअर सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली, रुग्णांकडून माहिती घेतली.   आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. शासन आपल्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहे. तुम्ही बरे होताय, काळजी करू नका. मनोधैर्य वाढवा, खचू नका, असेच हसत खेळत रहा, घाबरू नका, अशा शब्दात श्री. भरणे यांनी रूग्णांना धीर दिला.

बार्शीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालय वसतिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे पॉलिटेक्निक कॉलेज याठिकाणी

चार तर वैरागमध्ये श्रीसाई आयुर्वेदिक महाविद्यालयात कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी असणाऱ्या त्रुटींची त्वरित पूर्तता करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

सूरपाट्यांनी भारावले पालकमंत्री

पालकमंत्री श्री. भरणे आले त्यावेळी एकीकडे देशभक्तीपर गीते तर एकीकडे रुग्णांमध्ये सुरपाट्याचा खेळ रंगात आला होता. हे पाहून पालकमंत्री भारावून गेले. त्यांनी काही अंतरावरून रुग्णांशी संवाद साधला. आपणही सूरपाट्या खेळल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

वृक्षारोपण करण्याची रूग्णांची इच्छा

आम्ही रूग्ण म्हणून याठिकाणी असलो तरी या महाविद्यालयातील कोविड सेंटरची आठवण म्हणून आम्हाला येथे वृक्षारोपण करायचे आहे, खड्डे खांदून तयार आहेत, असे एका रूग्णाने पालकमंत्र्यांकडे विनंती केली. श्री. भरणे म्हणाले, हा चांगला उपक्रम आहे. रोपांची व्यवस्था त्वरित रोपे करण्यात येईल.

नागपंचमींला महिला रूग्णांचा फेर

या कोविड केअर सेंटरमध्ये मुले, मध्यमवयस्क, महिला हे आपल्या आवडीचे खेळ खेळत आहेत. नागपंचमीला महिलांनी सेंटरमधील मैदानातच फेर धरल्याचे रूग्णांनी आवर्जुन सांगितले.

लॉकडाऊन तुमच्या आरोग्यासाठीच

शासन आणि प्रशासनाला लॉकडाऊन करण्यात आनंद नाही. तालुक्यातील रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. आपल्याला रूग्ण कमी करायचे आहेत. प्रत्येकाच्या आरोग्यासाठी आणि जीविताचा धोका टाळण्यासाठी हा लॉकडाऊन आहे. प्रशासनाला सहकार्य करा, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, हात साबणाने धुवा, असे आवाहनही श्री. भरणे यांनी केले.


Previous Post

कुलगुरू म्हैसेकर यांनी घेतली भुजबळांची भेट

Next Post

विजयदुर्गच्या डागडुजीला केंद्राचा अडसर

Next Post

विजयदुर्गच्या डागडुजीला केंद्राचा अडसर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान (व्हिडिओ)

January 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

‘इंडिया दर्पण’मध्ये आता वास्तू शंकासमाधान; दर आठवड्याला या दिवशी

January 29, 2023

डास कानाजवळच का गाणं म्हणतात? संशोधकांना सापडलं इंटरेस्टिंग उत्तर

January 29, 2023

वजन घटवायचंय मग ही कॉफी नक्की प्या!

January 29, 2023

आरोग्यच्या प्रधान सचिवांनी अचानक दिली स्त्री रुग्णालयाला भेट

January 29, 2023

असे झाले बोमन इराणी ‘राजश्री प्रॉडक्शन’चा भाग; अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा

January 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group