नाशिक : गॅस गिझरचा अचानक भडका उडाल्याने गंभीर भाजलेल्या ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुरेखा दिलीप रत्नपारखी (५८, रा. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. सुरेखा रत्नपारखी या आंघोळीसाठी गरम पाणी काढत असताना बाथरूममधील गॅस गिझर तापल्याने ही घटना घडली होती. या घटनेत त्या ६५ टक्के भाजल्या होत्या. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ नजीकच्या साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता बुधवारी (दि.२९) सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.