India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

खेळाडूंना क्रीडा क्षेत्राशी जोडून ठेवण्यात यश

India Darpan by India Darpan
August 5, 2020
in संमिश्र वार्ता
0

कोरोना काळात क्रीडा विभागाकडून ऑनलाईन उपक्रमांना भरभरून प्रतिसाद

नाशिक – कोरोना काळात हेच थांबणं म्हणजे खेळाडूंच्या दृष्टीने अवघड बाब. मात्र, नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी खेळाडूंची ही बाब हेरली आणि त्यांच्यासाठी या लॉकडाऊनचा सदूपयोग करत विविध विषयांवर कार्यशाळा घेऊन त्यांना अद्ययावत ठेवले. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन कार्यशाळा भरवून तंदुरुस्ती, क्रीडा विषयक प्रश्नमंजुषा, आरोग्य व तंदुरुस्ती, ऑलंपिक विषयक प्रश्नमंजुषा, विविध क्रीडा विषयांवर निबंध असे उपक्रम घेतले आहेत. या उपक्रमांना क्रीडापटू, क्रीडाविषयक तज्ज्ञ, तसेच याविषयी आस्था असणाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला, अशी माहिती नाईक यांनी दिली.

कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात मार्चमध्ये  लॉकडाऊनची घोषणा केली. ही घोषणा झाल्यानंतर उच्चभ्रू समाजापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच जनजीवन लॉक झाले. यातील एक घटक म्हणजे खेळाडू. रोजचा सराव आणि शारीरिक कसरत हा खेळाडूंचा जणू काही श्वासच. ही बाब ओळखून जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे लॉकडाऊन काळातही क्रीडाप्रेमी क्रीडाक्षेत्राला जोडून होते. मैदानात सराव करण्यास मर्यादा असल्या तरी ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून क्रीडापटूंना क्रीडा विषयाशी जोडून ठेवण्याचे काम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

याचाच भाग म्हणून ‘कार्ल रंग फिटनेस स्पोर्टस् सायन्स असोसिएशन’च्या सहकार्याने  १० ते १७ एप्रिल या कालावधीत फिटनेस आणि स्पोर्टस् (आरोग्यवर्धक खेळ)  या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या ऑनलाईन कार्यशाळेत सुमारे ९०० लोकांनी सहभाग नोंदविला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पेठ तालुक्यातील दादासाहेब बिडकर आर्टस, सायन्स ॲन्ड कॉमर्स कॉलेजच्या सहकार्याने प्रश्नमंजुषा हा उपक्रम घेण्यात आला. विविध क्रीडा विषयांवरील या प्रश्नमंजुषा स्पर्धेत १२०० लोकांनी सहभाग घेतला होता.

कार्यशाळा, प्रश्नमंजुषा

तलवारबाजी खेळाशी निगडित असलेल्या खेळाडूंसाठी महाराष्ट्र राज्य तलवारबाजी असोसिएशनच्या माध्यमातून २६ एप्रिल ते ०३ मे या कालावधीत प्रारंभीक विषयांची कार्यशाळा आयोजित केली होती. या ‘ऑनलाईन बेसिक वर्कशॉप ऑन फेन्सिंग’ या उपक्रमात १ हजार लोकांनी सहभाग घेतला. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३ ते ७ मे दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या श्री सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयाच्या सहकार्याने आणि जून महिन्यात नाशिकच्या बिटको महाविद्यालयाच्या सहकार्याने  प्रश्नमंजुषा हा उपक्रम राबविण्यात आला. या दोन्ही उपक्रमांना ही क्रीडापटूंनी भरघोस प्रतिसाद नोंदविला.

निबंध स्पर्धा

आपल्या जीवनात आरोग्य व तंदुरुस्ती याचे महत्त्व विशद करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नाशिक शहरातील सिडको येथील के.एस.के.डब्ल्यू. महाविद्यालयाच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा कार्यालयाने कार्यशाळेचे आयोजन केले होते. ०४ ते १० मे  या कालावधीत झालेल्या ‘हेल्थ ॲण्ड फिटनेस-वे टू लाईफ’ या कार्यशाळेस भरघोस प्रतिसाद मिळाला. सुमारे १५०० अधिक लोकांनी तंदुरुस्तीचे महत्त्व यावेळी जाणून घेतले. औरंगाबादमधील कन्नडच्या शिवाजी  आर्टस, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेजच्या सहकार्याने ऑलंपिक विषयावरील प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातही मोठा प्रतिसाद मिळाला. कोविड प्रादुर्भावाच्या काळात तसेच कोविड प्रादुर्भाव संपल्यानंतर क्रीडा उपक्रम कसे असतील ? त्याचे आयोजन कशाप्रकारे करता येईल ? यासंबंधीची मते जाणून घेण्यासाठी नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी या विषयावर निबंधाच्या माध्यमातून अनेक उपयुक्त सूचना केल्या.

कोविडच्या कठीण परिस्थितीत आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी योग शास्त्राचे महत्त्व नागरिकांना समजावे, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नाशिक शहरातील के.एस.के.डब्ल्यू. महाविद्यालयच्या सहाय्याने निबंध स्पर्धा आयोजित केली होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कोविड काळात सातत्याने विविध उपक्रम राबवून क्रीडापटूंसह क्रीडा चाहत्यांना वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान देण्याचे काम केले आहे. या उपक्रमामुळे क्रीडापटूंना आपण आपल्या मैदानापासून दूर आहोत, हे जाणवले नाही. यासाठीच हे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांनी सांगितले.


Previous Post

सहा महिन्यात १ लाख १३ हजार २२९ दाखल्यांचे वितरण

Next Post

भाजप प्रदेश कार्यालयात आनंदोत्सव

Next Post

भाजप प्रदेश कार्यालयात आनंदोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे दररोज सकाळी ८.३० वाजता करतो जेवण… पण, का?

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

सर्वसामान्यांना मोठा झटका; १ एप्रिलपासून यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे

March 29, 2023

दीड कोटी रोपांचा पुरवठा… अत्याधुनिक सोयी, सुविधा… असे आहे बारामतीचे भाजीपाला गुणवत्ता केंद्र..

March 29, 2023

अयोध्येच्या श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूरहून सागवान काष्ठ आज रवाना होणार; शोभायात्रेची जय्यत तयारी, दोन हजार कलावंतांचा सहभाग

March 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

पुणे जिल्ह्यात ऐतिहासिक पीक कर्जवाटप… इतक्या शेतकऱ्यांना लाभ.. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यामुळे विक्रमी कामगिरी पुढाकाराचा परिणाम

March 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

स्टेट बँकेच्या शाखांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

March 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group