India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

क्रेडाई कल्पवृक्ष योजनेचा शुभारंभ; १० हजार झाडे लावणार

India Darpan by India Darpan
August 16, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – जग वाचविण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करावे लागेल, वृक्ष लागवड मोहीम त्यातील एक महत्वाचे पाऊलच नाही तर ती आजची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. क्रेडाई नाशिकच्या वतीने आयोजित केलेल्या कल्पवृक्ष या वृक्षलागवड मोहिमेचा आज त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
भुजबळ म्हणाले की,  जग वाचवायच असेल तर वृक्षारोपणाचे  काम निरंतर करावं लागणार आहे. त्यासाठी क्रेडाईने सामाजिक बांधिलकीतुन एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. वृक्षारोपण करतांना आपण किती झाड लावली याला महत्व नाही तर किती जगविली याला अधिक महत्व आहे. त्यामुळे जेवढी झाड लावली तेवढ्या झाडांची काळजी घेऊन ती जगविली पाहिजे. यासाठी सामूहिक जबाबदारीतुन हा कार्यक्रम हाती घेऊन झाड वाचविले पाहिजे, कारण आपण जे करू त्याचा फायदा समाजाला होणार आहे. त्यामुळे लावलेल्या झाडांचे चांगलं संगोपन करा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. क्रेडाईच्या माध्यमातून नाशिकमध्ये कल्पवृक्ष योजनेच्या माध्यमातून १५ ते २८ ऑगस्ट पर्यंत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामाध्यमातून १० हजार झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रवी महाजन यांनी दिली.
यावेळी अनंत राजेगावकर, नेमीचंद पोद्दार, सुरेश पाटील, सुनील कोतवाल, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, अनिल आहेर, नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, अंजन भालोडीया, समाधान जेजुरकर हे उपस्थित होते.

Previous Post

चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात नाशकातील या पोलिसांचा झाला सन्मान

Next Post

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात नाशकातील या पोलिसांचा झाला सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अंबड पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

June 8, 2023

तब्बल ११ दुकाने फोडणारा जेरबंद… नाशिक पोलिसांची कामगिरी… या गुन्ह्यांची उकल

June 8, 2023
प्रातिनिधिक फोटो

मोबाईल चोरणाऱ्यांचा नाशिक पोलिसांनी लावला छडा…. तिघे गजाआड… ४० मोबाईल हस्तगत…

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

अवघ्या १५ वर्षांच्या मुलाने घेतला गळफास… सातपूर परिसरातील घटना

June 8, 2023

रेपो दराबाबत रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा; बघा, तुमचा EMI वाढणार की कमी होणार?

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

नव्या पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांवर काय लिहायचं? शिक्षण विभागाने काढले हे आदेश

June 8, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group