India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

कोरोनाचे संकट सर्वांसाठी स्वावलंबी आणि सशक्त बनण्याची संधी; पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

India Darpan by India Darpan
August 16, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – कोरोनाच्या संकट काळात शासन, प्रशासन आणि नागरिकांचा पुढाकार कौतुकास पात्र आहे. त्यामुळेच कोरोनाचा संकट काळ हा आपणा सर्वांसाठी स्वावलंबी व सशक्त बनण्याची संधी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतंत्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७४ व्या वर्धापन दिनाचे ध्वजारोहण पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सिमा हिरे, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोरजे उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना तितक्याच झपाट्याने कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही लक्षणीय आणि आशादायी आहे. त्यात आपल्या जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषद प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन यांचे अहोरात्र परिश्रम आहेत. त्यातील अनेकांना कर्तव्यावर असताना कोरोनाची बाधा झाली. त्यात पोलीस यंत्रणा व आरोग्यकर्मी अत्यंत जोखीमेच्या शीर्षस्थानी आहेत. कोरोनाशी लढतांना जीव गमवलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांना दु:ख पचवण्याची व पुन्हा नव्याने आयुष्याची सुरूवात करण्याची क्षमता, बळ मिळो, असेही  पालकमंत्री म्हणाले.

इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर बनले लोकचळवळ

जिल्ह्यात कोरोना संकटाची परिस्थिती लक्षात घेवून जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरण व जिल्हा प्रशासना मार्फत इमर्जंन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात आली होती. गेल्या पाच महिन्यात या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरने केवळ सर्व प्रशासकीय यंत्रणेलाच नाही तर जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था, सामाजसेवक, उद्योग, धार्मिक संस्था यांना एका सांध्यात जोडून आपत्ती निवारणाच्या कामाला लोकाभिमुख चेहरा प्राप्त करून दिला आहे. इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या माध्यमातून शासकीय व प्रशासकीय मदतीचा प्रवाह एक लोक चळवळ बनला असल्याचे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

उपचाराबरोबरच इतर आवश्यक बाबींची शाश्वत साखळी निर्माण करण्यात यश

उपचाराबरोबरच निरनिराळ्या पातळीवरील आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण, अन्नधान्य वाटप, कृषी व त्यासंबंधीत जीवनावश्यक बाबी, उद्योग, औषध पुरवठा, कोरोना चेक पोस्ट, उद्योग परवाने आणि अन्नदानाची एक शाश्वत साखळी निर्माण करण्यात यश प्राप्त झाले आहे. या सर्व प्रक्रीयेत जनतेचा आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळेच संकट काळात गरजू व स्थलांतरीत लोकांसाठी 159 स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून 17 लाख 53 हजार 545 अन्न पाकीटांचे वाटप करून अन्नदान करू शकलो. त्याचप्रमाणे या कालावधीत 98 हजार 827 अन्न धान्याचे कीट व जीवनावश्यक वस्तू, 91 हजार 676 किलो धान्य, तसेच 1 लाख 13 हजार 524 मास्कचे वाटप करून शासन व प्रशासनाच्या कोरोना नियंत्रणाच्या कामाला हातभार लावला असल्याचे , पालकमंत्री म्हणाले.

पुरवठा विभागामुळे टळली उपासमार

या संकट काळात  कोणीचीही उपासमार होऊ नये यासाठी पुरवठा विभागामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंत्योदय योजनेंतर्गत 76 हजार 519 मे. टन गहू व तांदुळाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 71 हजार 512 मे. टन गहू व 6 हजार 531 मे. टन तांदुळाचे वाटपाबरोबरच ​केशरी शिधापत्रिका धारकांना 7 हजार 467 मे. टन गहू व 4 हजार 826 मे. टन तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. आत्मनिर्भर विनाशिधापत्रिका धारक योजनेंतर्गत मे व जून 2020 या कालावधीत 1 हजार 934 मे. टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे. कुणाचीही उपासमार होणार नाही या एका ध्यास आणि संकल्पाने राज्याचा अन्न, नागरी पुरवठा विभाग काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून शिवभोजन योजनेचा 26 जानेवारी 2020 प्रारंभ करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात 44 शिवभोजन केंद्रामार्फत आतापर्यंत 6 लाख 58 हजार 941 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याचे भुजबळ म्हणाले.

कोरोना संकटात संपूर्ण शेती अनलॉक

कोरोना संकटात संपूर्ण जग लॉकडाऊन असताना शेती मात्र अनलॉक होती. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी आणि शेती अडचणीत येणार नाही यासाठी शासन वचनबद्ध आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी पीककर्ज योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत खरीप हंगामासाठी 52 हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 हजार 362 कोटींचे रूपयांच्या कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात 58 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम धरण प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा 32 हजार 721 दशलक्ष घनफुट असून 50 टक्के इतका आहे. तर यंदाच्या खरीप हंगामात एकूण 5 लाख 69 हजार 313 हेक्टर क्षेत्रात 85 टक्के खरीपाची पेरणी झाली आहे. संकटे कितीही आली तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सदैव  त्यांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देखील पालकमंत्री भुजबळ यांनी याप्रसंगी दिली आहे.

कोरोनाशी सामना करताना उद्योगधंदे चालू रहावेत व कष्टकऱ्यांच्या हाताला काम व अर्थकारणाला चालना मिळावी या हेतुने लॉकडाऊनच्या कालावधीतही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी 500 कंपन्या जिल्ह्यात सुरू होत्या. त्यानंतर मे महिन्यापर्यंत शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात साधारण 12 हजार उद्योग सुरु झाले आहेत, त्यात लाखो कामगार काम करत असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

‘ई स्काय व ई साय क्लिनिक’ चे लोकार्पण

कोरोना साथरोग काळामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पॉझिटिव्ह व गंभीर रुग्णांवर क्लाऊड फिजिशियनद्वारे रुग्णांचे मॉनेटरिंग करून ‘ई स्काय क्लिनिक’ चे लोकार्पण करण्यात आले. कोरोना काळात नागरिकांची व रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ‘ई साय क्लिनीक’द्वारे समुपदेशन करण्याचा उपक्रमाचा शुभारंभदेखील पालकमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला आहे.

 ध्वजारोहण कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण

कोरोना विषाणुच्या प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना ध्वजारोहणाचा कार्यक्रम पाहता यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने यावर्षी Distric Information Office, Nashik या फेसबुक पेजच्या माध्यमातून ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले आहे.


Previous Post

स्वातंत्र्यदिन- नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. के सी पाडवी यांचा लेख

Next Post

कोचिंग क्लासेस लवकरच सुरू होणार

Next Post

कोचिंग क्लासेस लवकरच सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘इंडिया दर्पण’मध्ये उलगडणार आता गोदाकाठचे वैभव; इतिहास अभ्यासक देवांग जानी देणार खरीखुरी माहिती

February 3, 2023

बाबो! गल्लीत पार्क केलेली दुचाकी जेव्हा अचानक सुरू होते… कसं काय? तुम्हीच बघा हा व्हायरल व्हिडिओ

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group