India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

स्पर्धा परीक्षेबाबत तिन्ही मान्यवरांचे अनमोल मार्गदर्शन; शिक्षणविश्वला मोठा प्रतिसाद

India Darpan by India Darpan
August 20, 2020
in स्थानिक बातम्या
0

नाशिक – स्पर्धा परीक्षेची तयारी का करतो ? असा प्रश्न स्वत:ला पडायला हवा. त्याचे उत्तर शोधल्यास, करिअरचा मार्ग सापडतो. पुढे ‘ग्रुप स्टडी’च्या माध्यमातून परीक्षेची तयारी केल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन कल्याण-डोबिंवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केले.
कॉलेज रोड, गंगापूर रोड वाणी मित्र मंडळाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘शिक्षणविश्व’ या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमात चाणक्य मंडळ परिवाराचे संचालक डॉ. अविनाश धर्माधिकारी, मुंबई येथील जीएसटी विभागाचे सहाय्यक आयुक्त निलेश कोठावदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पुढे बोलताना डॉ. सुर्यवंशी म्हणाले की, ‘बर्‍याचदा आपला मित्र किंवा गावातील कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो म्हणून आपणही स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. त्याहीपेक्षा घरातील वरिष्ठ मंडळी स्पर्धा परीक्षेचा हट्ट धरतात म्हणून स्पर्धा परीक्षेचा विचार मनात येतो. ही बाब पूर्णत: चुकीची आहे. स्पर्धा परीक्षेचा विचार करताना ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. ध्येय निश्चित केल्यास करिअरचा मार्ग सापडतो. पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करियर करण्याचा विचार केल्यास ‘ग्रुप स्टडी’ हा भाग येतो. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चांगल्या मित्रांची संगत फार महत्त्वाची असते. ब-याचदा अपयश आल्यास आपण खचून जातो, मात्र मित्रांनी बळ दिल्यास पुन्हा आपण जोमाने यशाच्या मागे लागतो अन् तेथूनच निश्चित ध्येय गाठतो असेही डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले.
डॉ. अविनाश धर्माधिकारी म्हणाले की, ‘स्वत:ला ओळखून क्षेत्र निवडायला हवे, निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत व्हावे हेच स्वत:च्या जडणघडणीचे सूत्र आहे. त्यामुळे कागदवरचे गुण म्हणजे बुद्धीमत्ता असे म्हणता येणार नाही, असे डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले. तर निलेश कोठावदे यांनी एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांची माहिती दिली. अनेक विद्यार्थी असे म्हणतात की, समाजसेवा करण्यासाठी मला स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. माझ्या मते हा उद्देश जरी योग्य असला तरी, फारसा संयुक्तीक नाही. कारण एन नोकरीचे साधन म्हणून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे बघायला हवे. समाजसेवाच करायची असेल तर एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातूनही ती करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरीचे साधन म्हणून या परीक्षांकडे बघणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले.  यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश राणे, संस्थापक अध्यक्ष नितीन दहिवेलकर, विश्वस्त योगेश मालपुरे, दिपक बागड, सुनील फरांदे, नंदकिशोर कोठावदे, संजय शिरूडे, महेश उदावंत आदी उपस्थित होते. झुम अॅपच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरचिटणीस महेश पितृभक्त, उपाध्यक्ष संजय दुसे, संजय बागड, चिटणीस राजेंद्र कोठावदे, खजिनदार निलेश मकर, हितेश देव, भगवंत येवला, अॅड. देवदत्त सायखेडकर व संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले.

Previous Post

नॅशनल स्पेस सोसायटीच्या नाशिक चॅप्टरला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

Next Post

मुंबई – नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

Next Post

मुंबई - नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर रणवीर सिंगने सोडले मौन; म्हणाला…

March 31, 2023

केवळ न्यायालयीन लढ्यावर इतक्या कोटींचा खर्च; अद्यापही न्यायालयाचा निकाल नाही

March 31, 2023

पीएमश्री योजनेत राज्यातील एवढ्या शाळांची निवड; केंद्र सरकारने दिली मान्यता

March 31, 2023

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास

March 31, 2023

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण… असा आहे त्याचा निष्कर्ष…

March 31, 2023

यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये? हालचालींना वेग

March 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group