India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

केंद्राच्या पर्यावरण मसुद्याविरोधात आता राज्य सरकारही; पुनर्मुल्यांकन करण्याची मागणी

India Darpan by India Darpan
August 12, 2020
in राज्य
0

मुंबई – पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (ईआयए) मसुद्यावरुन देशभरात विरोधाची लाट असून त्यात महाविकास आघाडीचे सरकारही पुढे आले आहे.  पुनर्मुल्यांकन करण्याची विनंती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली आहे. तसे पत्र त्यांनी पाठविले आहे.
काँग्रेस नेते राहूल गांधींपासून अनेकांनी ईआयए विरोधात आवाज उठविला आहे. त्यात आता ठाकरे यांचीही भर पडली आहे. ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, सध्या अस्तित्त्वात असलेली अधिसूचना पॅरिस कराराशी जुळत नाही आणि आपल्या शाश्वत वाढ साध्य करण्याच्या उद्दिष्टाला मोठा धोका निर्माण करणारी आहे. कोल प्रॉस्पेक्टिंग, धातूचे क्रशिंग आणि स्क्रीनिंग, तेल आणि वायू उत्खननासाठी केलेले सर्वेक्षण यासारख्या पर्यावरणासाठी विध्वंसक अनेक कृतींना ईआयए मसुद्यामधून सूट देण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये सुरक्षित राहणार नाहीत. बी-२ श्रेणीतील प्रकल्पांचे ज्यात धोकादायक उद्योग (रेड आणि ऑरेंज इंडस्ट्रीज) जोडले गेले आहेत त्यांचे आता मूल्यांकन केले जाणार नाही. अधिसूचनेचा मसुदा हा प्रकल्पधारकांना एक्स-पोस्ट फॅक्टो ईसी मंजूर करण्यास अनुमती देतो जे कायद्याचे (क्लॉज-२२) स्पष्ट उल्लंघन करते. आपले पर्यावरण वाचवण्याच्या हे अगदी विपरीत आहे, असे मंत्री ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

ईआयए मसुदा अहवाल जनतेसाठी उपलब्ध होणार नाही, परंतु केवळ लेखी विनंतीवरच उपलब्ध करुन देण्यात येईल आणि तो देखील कार्यालयीन वेळेत अधिसूचित ठिकाणी इलेक्ट्रॉनिक तपासणीसाठी उपलब्ध होईल. जर जनतेसोबत विचारविनिमय केल्याशिवाय प्रकल्प पूर्ण केले तर कोकणातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील प्रदेश जिथे २.८ कोटीपेक्षा जास्त लोक राहतात, त्यांच्यावर विपरीत परिणाम होईल असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे. जगातील जैविक विविधतेच्या ८ हॉटेस्ट हॉटस्पॉटमध्ये असलेल्या पश्चिम घाटाबाबतही त्यांनी पत्रामध्ये नमूद केले असून या घाटाचा एक मोठा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

परिभाषा संकुचित केली

ईआयए अधिसूचनेच्या मसुद्यामध्ये पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राची परिभाषा संकुचित करण्यात आली असून त्यामधून गावे, जंगले आणि किनारपट्टी वगळण्यात आली आहेत. पर्यावरणासंदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारच्या भूमिकेला कमी महत्त्व दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून त्याचे पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांवर थेट परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

पर्यावरण संरक्षणावर परिणाम

ईआयए अधिसूचनेचा मसुदा २०२० हा केंद्र सरकारला राज्य ईआयए प्राधिकरणाची नेमणूक करण्याचे अधिकार देते. राज्य सरकार हे पर्यावरणीय बाबींशी जास्त एकरूप असतात, कारण त्यांना त्यांच्या स्थानिक प्रदेशांच्या पर्यावरणीय संवेदनशीलतेचे अधिक चांगले ज्ञान असते. विकेंद्रीकरण करण्याऐवजी पर्यावरणीय मंजुरीमधील अशा केंद्रीकरणामुळे केवळ अडथळे निर्माण होतील किंवा स्थानिक समस्या लक्षात न घेता प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. यावरील राज्य सरकारचे नियंत्रण कमी केल्याचा थेट परिणाम पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांवर होईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.


Previous Post

दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन; महायुतीच्या बैठकीत निर्णय

Next Post

मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये; मोदींनी घेतला १० राज्यातील कोरोनाचा आढावा

Next Post

मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये; मोदींनी घेतला १० राज्यातील कोरोनाचा आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

व्हायरल व्हिडीओ; रस्त्यावर लावलेली दुचाकी रात्री जेव्हा अचानक सुरू होते (बघा व्हिडिओ)

February 3, 2023

येवला – वैजापूर रोडवर मालट्रक पलटी; चालक गंभीर जखमी.

February 3, 2023

‘अंनिस’चे कृष्णा चांदगुडे यांना मातृशोक; कर्मकांडाला फाटा देत घेतला हा निर्णय

February 3, 2023

नाशिक पदवीधरची अंतिम आकडेवारी जाहीर; बघा, कुणाला किती मते मिळाली?

February 3, 2023

मालेगाव तालुक्यातील शेतकरी महिलेच्या खून प्रकरणाचा उलगडा; या कारणाने केला होता खून

February 3, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

February 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group