India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंतची विक्रमी संख्या

India Darpan by India Darpan
August 5, 2020
in राज्य
0

कोरोनामुक्त रुग्णांची संख्या पोहोचली तीन लाखापर्यंत, राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ६६ टक्क्यांवर

मुंबई – राज्यात आज आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून मंगळवारी (४ ऑगस्ट) सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. मंगळवारी दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२  हजार १५१  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

मंगळवारी निदान झालेले ७७६० नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-७०९ (५६), ठाणे- १४२ (६), ठाणे मनपा-२२६ (७),नवी मुंबई मनपा-२५९ (७), कल्याण डोंबिवली मनपा-१०३ (६),उल्हासनगर मनपा-३९ (१), भिवंडी निजामपूर मनपा-१५ (१६) , मीरा भाईंदर मनपा-८९ (८),पालघर-१२३ (१), वसई-विरार मनपा-८६ (४), रायगड-१२९ (६), पनवेल मनपा-१०६, नाशिक-११०(४),नाशिक मनपा-३३७ (५), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-२०७ (२), अहमदनगर मनपा-१२०, धुळे-१० (२), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-२४९ (७), जळगाव मनपा-४१ (५), नंदूरबार-१० (२), पुणे- ३२६ (१०), पुणे मनपा-१२९६ (२९), पिंपरी चिंचवड मनपा-५८५ (१७), सोलापूर-१६३ (३), सोलापूर मनपा-३७ (१), सातारा-१६३ (१), कोल्हापूर-२०९ (२९), कोल्हापूर मनपा-३४ (४), सांगली-१०९ (५), सांगली मिरज कुपवाड मनपा-१४६ (३), सिंधुदूर्ग-१४, रत्नागिरी-५८, औरंगाबाद-१२४ (१), औरंगाबाद मनपा-९७ (१०), जालना-१, हिंगोली-३, परभणी-१८, परभणी मनपा-२४,लातूर-७५(१), लातूर मनपा-४४ (५), उस्मानाबाद-३४४ (२), बीड-५७ , नांदेड-४३ (२), नांदेड मनपा-५५ (१), अकोला-११ (२), अकोला मनपा-५ (१), अमरावती- ३ (१), अमरावती मनपा-६९, यवतमाळ-५२, बुलढाणा-८७ (१), वाशिम-६४, नागपूर-६२ (३), नागपूर मनपा-१७४ (१४), वर्धा-११ (१), गोंदिया-१७, चंद्रपूर-११, चंद्रपूर मनपा-१, गडचिरोली-१२, इतर राज्य १३.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.


Previous Post

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे निधन

Next Post

असे असेल राम मंदिर. पहा संकल्पचित्र

Next Post

असे असेल राम मंदिर. पहा संकल्पचित्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेपो दराबाबत रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा; बघा, तुमचा EMI वाढणार की कमी होणार?

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

नव्या पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांवर काय लिहायचं? शिक्षण विभागाने काढले हे आदेश

June 8, 2023

सटाण्यात महावितरणचा लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात; यासाठी शेतकऱ्याकडे मागितली ३० हजाराची लाच

June 8, 2023

धक्कादायक… प्रेयसीला आधी मिठी मारली… नंतर मेट्रो रेल्वेसमोर तिच्यासह… व्हिडिओ व्हायरल

June 8, 2023

योगींचा मास्टरस्ट्रोक.. आधी माफियांची घरे पाडली… त्यावर हा प्रकल्प उभारला… आता गरिबांना होणार हा फायदा

June 8, 2023
प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशात कोर्टही असुरक्षित… चक्क न्यायाधीशांच्या समोरच कोर्टरुममध्ये माफियाला घातल्या गोळ्या…

June 8, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group