उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात लहान कोविड योद्धा विजयी; बाळ होते १८ दिवसांचे

नाशिक – अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल येथे नुकतेच अतिशय गंभीर परिस्थितीत एक नवजात अर्भक दाखल झाले. या बाळाला घरातील इतर सगळे सदस्य बाधित झाल्याने संसर्ग झाला होता या बाळाला पुनर्जीवन देण्यासाठी एका सक्षम आणि परिपूर्ण हॉस्पिटलची गरज होती..  ती गरज अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या टीमने लीलया पेलल्याचे डॅा. सुशील पारख यांनी सांगितले.
बाळ ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये दाखल झालं त्यावेळेस त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, हृदयाची गती अनियमित झाली होती, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने किडनीला सूज आली होती, रक्त गोठण्याची प्रक्रिया दोषपूर्ण झाली होती, आणि एचआरसीटीचा स्कोर हा नऊ  पासून चौदा पर्यंत पोहोचला होता. अशा बिकट परिस्थितीत डॉक्टर सुशील पारख, बाल रोग तज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल यांनी या बाळावर उपचार करण्यास सुरुवात केली.
आधुनिक तंत्रज्ञान, जगविख्यात सुविधा आणि तज्ञ डॉक्टरांचे अनुभव आणि उपचार पद्धती  याच्या जोरावर या बाळाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांच्या चमूला यश मिळाले. यात डॉ. सुशील पारख, डॉ. सचिन पाटील, डॉ. नेहा मुखी, डॉ. पूजा चाफळकर, नर्सिंग टीम व हॉस्पिटल मधील सर्व कर्मचारी यांच्या परिश्रमाने बाळ सुखरूप घरी गेले आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना डॉक्टर सुशील पारख यांनी सांगितले की उत्तर महाराष्ट्रातील कित्येक लहान मुलं सध्या कोविड संक्रमित होत आहेत आणि त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करून अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल हे  लहान मुलांसाठी सर्वोत्तम हॉस्पिटल असल्याचे सिद्ध करत आहे,  सध्या लहान मुलं आता घराबाहेर जायला लागले आहेत. बऱ्याच वेळेस त्यांना खेळताना किंवा बाहेर वावरताना त्रिसूत्रीचा अवलंब करता येत नाही.  मग ते कोविड मुळे संक्रमित होऊन कॅरियर बनवून इतर घरातील व्यक्तींना संक्रमित करण्याचा धोका वाढवत आहेत, घरातील मोठ्या मंडळींनी लहान मुलांना देखील त्रिसूत्रीचा अवलंब करायला शिकवायला हवे, आणि जर लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, उलटी येणे, जुलाब होणे… अशी लक्षणे दिसत असल्यास आपल्या जवळच्या लहान मुलांच्या तज्ञ डॉक्टरांना जरूर दाखवावे आणि कुठलीही अधिक मदत लागल्यास डॉक्टर सुशील पारख, अशोका मेडिकल हॉस्पिटल यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
डॉ. सुशील पारख यांचे कौतुक
अशोका मेडिकल हॉस्पिटल, हे उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक सुविधा देणारे,  सर्व लहान मुलांचे सुपर स्पेशालिस्ट एकाच छताखाली असणारे.. हॉस्पिटल आहे..  लहान मुलांच्या सर्व रोगांवर येथे यशस्वी उपचार होत आहेत.. फक्त २ महिन्याच्या कोविड बाधित बाळावर.. जगातला पहिला प्लास्मा ट्रान्सप्लांट करून आपली किर्ती अगोदरच डॉ सुशील पारख आणि त्याच्या टीमने नाशिक चे नाव वैद्यकीय क्षेत्रात मोठे केले आहे.  आणि आता या सगळ्यात लहान वयाच्या बाळावर यशस्वी उपचार केल्यामुळे डॉक्टर सुशील पारख आणि अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.