India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ई कोर्ट सुरु झाल्याने बार कौन्सिलची अनोखी योजना

India Darpan by India Darpan
August 8, 2020
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – नाशिकमध्ये ई कोर्ट प्रकल्प सुरू झाल्याने महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने वकीलांसाठी अनोखी योजना आणली आहे. या योजनेची नोंदणी सुरू झाली असून त्याचा अधिकाधिक लाभ वकीलांनी घ्यावा, असे आवाहन कौन्सिलने केले आहे.

नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड नितीन ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या पुढाकाराने सर्वोच्च न्यायालयाचा पहिला ई कोर्ट प्रोजेक्ट नाशिकमध्ये कार्यन्वित झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे उदघाटन झाले आहे. अशाच प्रकारचे ई-कोर्ट प्रोजेक्ट महाराष्ट्रभर आणि देशभर सुरू करण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या ई कोर्टस कमिटीचा मानस आहे. त्याचे निमित्त साधून सर्व वकील बंधू-भगिनींना उत्कृष्ट लॅपटॉप यापुढे आवश्यक झालेला आहे. जितका चांगला लॅपटॉप तितक्या चांगल्या प्रकारे भविष्यात इंटरनेटद्वारे कोर्ट कामकाज करता येणार असल्याचे अॅड अविनाश भिडे यांनी सांगितले आहे. याचा विचार करून सर्व वकिलांना उत्तम लॅपटॉप खरेदी करता यावा यासाठी दि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी लॅपटॉप योजना २०२० आणल्याचे कौन्सिलचे अॅड अविनाश भिडे यांनी सांगितले आहे. या योजनेमध्ये नामांकीत कंपनीचे लॅपटॉप सवलतीच्या दरात वकीलांना खरेदी करता येणार आहेत. लॅपटॉप खरेदीकरिता बँकेकडून कर्जाची उपलब्धता देखील केली जाणार आहे. इच्छूक वकीलांनी गुगल फॉर्म भरून सबमिट करुन माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे अॅड जयंत जायभावे यांनी सांगितले आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अर्ज भरावा, असे आवाहन अॅड सुधीर कोतवाल यांनी केले आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSccFEAbluMhzOiiIEkFYI6ytBrYdRB28hVV4Hkb8FYaOMdqiw/viewform?vc=0&c=0&w=1&usp=mail_form_link


Previous Post

भरमसाठ वीज बिलातून महावितरणचा महाघोटाळा

Next Post

१० ऑगस्टपासून पुन्हा पाऊस; राज्यभरासाठी इशारा

Next Post

१० ऑगस्टपासून पुन्हा पाऊस; राज्यभरासाठी इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रातिनिधीक छायाचित्र

काय सांगता? तब्बल एक लाख एकर शेतीला बांधच नाही! कुठे आणि कसं काय?

January 29, 2023

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम; ‘प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान (व्हिडिओ)

January 29, 2023
प्रातिनिधीक फोटो

‘इंडिया दर्पण’मध्ये आता वास्तू शंकासमाधान; दर आठवड्याला या दिवशी

January 29, 2023

डास कानाजवळच का गाणं म्हणतात? संशोधकांना सापडलं इंटरेस्टिंग उत्तर

January 29, 2023

वजन घटवायचंय मग ही कॉफी नक्की प्या!

January 29, 2023

आरोग्यच्या प्रधान सचिवांनी अचानक दिली स्त्री रुग्णालयाला भेट

January 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group