मुंबई – अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः व्हिडीओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले आहे. त्या सुखरूप असून काळजीचे कारण नसल्याचे त्यांनी व्हिडियोद्वारे सांगितले आहे. त्यांना कोरोनाची कोणतेही लक्षण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. निवेदिता सराफ सध्या झी मराठीवर ‘अग्गोबाई सासूबाई’ या मालिकेत काम करत आहेत. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांनी तत्काळ सेटवरील सर्वाना चाचणी करून घेण्यास सांगितली. त्यांच्याप्रमाणे अशोक सराफ व घरातील संबंधित व्यक्तींची चाचणी निगेटिव्ह आल्याचे त्यांनी यात सांगितले आहे. ‘कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवली नाहीत, फक्त थोडी सर्दी झाली होती. १२ तास मालिकेचे चित्रिकरण करत होते परंतु सर्दी झाल्याचे कळताच तत्काळ कोरोना चाचणी करून घेतली, काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे त्यांनी व्हिडीओद्वारे सांगितले आहे.