India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

…अन् ‘व्यवसाय शिक्षण’चे कामही सुरू झाले ऑनलाईन

India Darpan by India Darpan
August 7, 2020
in संमिश्र वार्ता
4

सांघिक प्रयत्नातून आले यश. विद्यार्थ्यांचे नुकसान टळले
नाशिक – कोरोनामुळे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाच्या कामालाही फटका बसला. पण, म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग. सहसंचालक पी एम वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राचार्य आणि शिक्षकांनी प्रयत्न केले. अखेर त्यात यश आले. त्यामुळेच ऑनलाईन लिंकही साकारण्यात आली असून त्याद्वारे प्रात्यक्षिकही सुरू झाले आहेत. त्यामुळे सांघिक प्रयत्नातून ज्ञानगंगा वाहती ठेवता येऊ शकते याचा वास्तुपाठही यानिमित्ताने विभागाने घालून दिला आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे कौशल्य आधारित अशा आयटीआयचे प्रशिक्षण कसे द्यायचे हा प्रश्न होता. म्हणून सहसंचालक वाकडे यांनी ऑनलाईन सर्व संस्थाची बैठक घेवून प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरु राहण्याचे निर्देश दिले. त्यानुसार  प्रत्येक व्यवसाय निहाय निदेशकांचा व्हाटसअॅप ग्रुप तयार करण्यात आला. त्यात वेळापत्रकानुसार थेअरी व इतर विषयाचे मार्गदर्शन, मॉक टेस्ट, प्रात्यक्षिक याचे नियोजन करण्यात आले. ते निदेशकांनी आपआपल्या प्रशिक्षणार्थी ग्रुप वर दिले.
ऑनलाईन वर्ग घेवून अभ्यासक्रम पुर्ण करावा तसेच प्रात्यक्षिकांचे व्हिडीओ लिंक घ्यावेत, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रादेशिक स्रातवरील जोडारी व्यवसायाच्या ग्रुप साठी प्राचार्य तथा समन्वयक दिपक बावीस्कर व आर एस खोजे यांची नेमणूक करण्यात आली. ग्रुपचे नोडल समन्वयक निदेशक ए.जी.महाजन व एस.वाय. वैद्य यांनी ग्रुपच्या वेळापत्रकाप्रमाणे काम कसे सुरळीत राहिल व संपूर्ण नियोजनाचे कामकाज पार पाडले. सदर सांघिक प्रयत्नाने ग्रुप मधील निदेशकांनी प्रशिक्षणार्थींना सहज सोपे व एकाच जागी माहिती दिली. जोडारी विषयाचे दोन्ही वर्षाचे अभ्यासक्रम, ऑनलाईन मॉक टेस्ट, एमसीक्यु, महिनानिहाय वेळापत्रक, ऑफलाईन प्रश्नपत्रिका, सैध्दांतिक व प्रात्यक्षिकांचे व्हिडीओ लिंक सारे काम वेगाने सुरू झाले. ई लर्निंगसाठी गुगल साईटस वेब लिंकही तयार करण्यात आली. या कामाची जबाबदारी नांदगावचे शिक्षक गायकवाड, जे बी पाटील व साबळे यांना देण्यात आली. गुगल साईटस मधील संपूर्ण प्रशिक्षण साहित्य आता शिकत असलेले व नविन प्रवेशित प्रशिक्षणा-यांना निश्चीत उपयोगी ठरत आहे.
गुगल साईट वेब लिंकचे उदघाटन सहसंचालक वाकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आता प्रादेशिक कार्यालयाच्या वेबसाईटला जोडण्यात आली. परिणामी हा राज्यासाठीच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. राज्याच्या अन्य भागातसुद्धा ही लिंक वापरली जात आहे.
लिंकच्या उदघाटनप्रसंगी प्रादेशिक कार्यालयाचे सहायक संचालक मानकर, निरिक्षक देसाई, प्रोग्रामर प्रविण ठाकरे,  पाटील, समन्वयक दिपक बाविस्कर, आर.एस.खोजे, ग्रुप नोडल समन्वयक निदेशक ए.जी.महाजन, दिंडोरीचे एस वाय वैद्य, लिंक विकसीत करणारे गायकवाड, नांदगावचे जे बी पाटील आदी उपस्थित होते.

Previous Post

देशातील पहिली किसान रेल्वे सुरू; देवळालीहून दानापूरला रवाना

Next Post

चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयास वातानुकूलित शवपेटी भेट

Next Post

चांदवडच्या ग्रामीण रुग्णालयास वातानुकूलित शवपेटी भेट

Comments 4

  1. Abhishek Sanjay Ghodke says:
    3 years ago

    Online test

    Reply
  2. Abhishek Sanjay Ghodke says:
    3 years ago

    Moka test

    Reply
  3. Abhishek Sanjay Ghodke says:
    3 years ago

    ITI

    Reply
  4. Abhishek Sanjay Ghodke says:
    3 years ago

    ITI fitter

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023

तहसीलदार, नायब तहसीलदारांची कंत्राटी पदभरती; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे स्पष्टीकरण

September 29, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी खर्चाची तयारी ठेवा, जाणून घ्या, शनिवार – ३० सप्टेंबर २०२३ चे राशिभविष्य

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

धक्कादायक…..दिडोंरीत बलात्काराच्या गुन्हात अटक असलेला आरोपी नाशिकमध्ये पोलिसांच्या हातावर तुरी देत पळून गेला.. बघा…नेमकं काय घडलं

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group