नाशिक – राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांकरिता सुधारीत मतदार यादी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 20 जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या यादीवर हरकती असल्यास २५ जुलै २०२२ पर्यंत दाखल करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.
या संदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, नाशिक जिल्हा परिषद पंचायत समिती – २०२२ सार्वत्रिक निवडणूकीकरिता सर्व तहसील कार्यालये व पंचायत समिती कार्यालय येथे प्रारूप मतदार यादी सर्व नागरिकांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीवर हरकती असल्यास त्या संबंधित तहसीलदार यांच्याकडे २५ जुलै २०२२ पर्यंत दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आवाहन केले आहे.