मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका लोकप्रिय झाल्या असून या सध्या एक मालिका अधिकच लोकप्रिय झालेली दिसून येते, ती म्हणजे ‘तू तेव्हा तशी’ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. टीव्हीवर काही मालीका अल्पावधीतच लोकप्रिय ठरत आहेत त्यापैकीच एक म्हणजे तू तेव्हा तशी मालिका होय, ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. आपल्या मनातील भावना अनामिका व्यक्त करू शकेल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
जीवनात प्रत्येकासाठीच पहिल्या प्रेमाचे खूप विशेष स्थान असते आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचे राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारत आहे.
विशेष म्हणजे ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या शीर्षक गीताचे शब्द अभिषेक खणकर यांचे असून अभय जोधपूरकरने ते गायलं आहे. हे शीर्षक गीत संगीतकार समीर सप्तीसकरने संगीतबद्ध केलं आहे. तसेच अभिनेता स्वप्निल जोशी याने एकापेक्षा एक असे मराठी हिट सिनेमे दिले आहेत. याशिवाय वेबसिरीज, सिनेमा, मालिका, नाटक या सर्व माध्यमात त्याने काम केले आहे. पण आता ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचा आणखी लाडका बनला आहे.
या मालिकेतील अनामिका आणि सौरभची अव्यक्त प्रेमकथा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. आता प्रेक्षकांना मालिकेत लवकरच एक आश्चर्यकारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत अनामिका आणि पट्याच्या प्रेमकहाणीसोबत नील आणि राधाची प्रेमकहाणीदेखील प्रेक्षकांना पाहायला आवडत आहे. तसेच अनामिका सौरभ लग्न कधी करणार याकडे लक्ष असतानाच मालिकेत अचानकपणे आश्चर्यकारक घडामोडी घडताना दिसणार आहेत.
https://twitter.com/zeemarathi/status/1551895581718487043?s=20&t=h4In5zQO08wITAc7KZpgBQ
यात एका गाण्यासाठी मालिकेच्या कलाकारांनी नटूनथटून सेटवर हजेरी लावली. यावेळी मालिकेत एक गाणं दाखवलं जाणार आहे ज्यात सर्व कलाकार सजून गाण्यावर ठेका धरताना दिसणार आहे. या गाण्याच शूटिंग नुकतंच झालं असून झालं असून हे गाणं येत्या रविवारी एक तासाच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मात्र मालिकेतला हा सोहळा नेमका कशासाठी हे अजूनही गुलदस्त्यात ठेवलेले पाहायला मिळत आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे अनामिका आणि सौरभचे लग्न होय.
महत्वाचे म्हणजे या गाण्यासाठी वल्ली आणि अनामिका देखील एकत्र आल्या आहेत. सोबतच चंदू चिमणा चिमणीचीही जोडी गाण्यात झळकणार आहे. या विशेष भागात अनामिका आणि सौरभ प्रेक्षकांना एक सरप्राईज देणार आहेत. हे सरप्राईज काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. तू तेव्हा तशी या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रविवारी दि. ३१ जुलै दुपारी १ आणि रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
https://twitter.com/zeemarathi/status/1551878366831136769?s=20&t=h4In5zQO08wITAc7KZpgBQ
Zee Marathi TV Serial Tu Tevha Tashi Twist New Turn