इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका हे प्रेक्षकांचं मनोरंजनाचं अत्यंत आवडीचं साधन आहे. या मालिका घराघरात पहिल्या जातात. आणि त्या चांगल्याच लोकप्रियही होतात. या मालिका जगतात अनेक वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. नवनवीन मालिकाही येत असतात. अशा नव्या मालिका आल्या की जुन्या मालिकांच्या वेळा बदलल्या जातात. मालिकांची लोकप्रियता पाहता, मालिकांमधील हे बदल प्रेक्षकांना देखील तातडीने कळवले जातात. अशाचप्रकारे दोन मालिकांच्या वेळा बदलल्या जाणार असून प्रेक्षकांना त्याची माहिती देखील देण्यात आली आहे.
या मालिकांची बदलणार वेळ
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रमांच्या यादीत भावोजींच्या अर्थात आदेश बांदेकरांच्या ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम अत्यंत वरच्या क्रमांकावर आहे. आता या लोकप्रिय कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली आहे. ‘होम मिनिस्टर’प्रमाणेच ‘यशोदा – गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेचीदेखील वेळ बदलण्यात आली आहे.
‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम सध्या सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित होतो. पण आता या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली आहे. ८ मे पासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना सायंकाळी ५.३० वाजता दिसणार आहे. झी मराठीने एक खास व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘यशोदा’ मालिकेची वेळ बदलली
असून आता सायंकाळी सहा वाजता या मालिकेचे प्रसारण होणार आहे. ‘यशोदा’ ही मालिका आधी दुपारी साडे बारा वाजता प्रसारित होत होती.
भावोजी येणार घरी, आता अर्धा तास आधी..!!
पहा 'होम मिनिस्टर'
8 मे पासून, 5.30 PM#KutumbashiGappa #ZeeMarathi #HomeMinisterआपल्या आवडत्या शोजचे पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी https://t.co/9q8IXxYaSG या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करा Zee5 ॲप. pic.twitter.com/tvwmPhiip6
— Zee Marathi (@zeemarathi) May 1, 2023
का बदलली वेळ?
‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम कितीही लोकप्रिय असला तरी अलीकडे छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या विषयांवरील अनेक मालिका असल्याने सध्या तरी टीआरपीच्या शर्यतीत हा कार्यक्रम मागे पडला आहे. नुकत्याच आलेल्या टीआरपी रिपोर्टनुसार, ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम पहिल्या दहातही नाही. यामुळेच या कार्यक्रमाची वेळ बदलल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे ‘यशोदा गोष्ट श्यामच्या आईची’ या मालिकेची वेळ प्रेक्षकांच्या आग्रहावरून बदलण्यात आली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. साने गुरुजींना घडवणाऱ्या आईची कथा सांगणारी ही मालिका आहे. मुलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही मालिका दुपारी दाखवली जात असल्याने मुलांना बघता येत नाही, असा आक्षेप होता. त्यामुळे या मालिकेची दुपारची वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे निर्मात्यांना फोन कॉल्स आणि मेल आले. प्रेक्षकांचा आदर राखत निर्मात्यांनी या मालिकेची वेळ बदलली आहे.
Zee Marathi TV Serial Home Minister Time Changes