India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

आयपीएलमध्ये कोटी कोटीचे करार होतात… पण, खरंच एवढे पैसे मिळतात का? खरं काय आहे?

India Darpan by India Darpan
May 3, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलमध्ये लिलावादरम्यान कोटींच्या भावात खेळाडूंना खरेदी केले जाते. पण खेळाडूंच्या खात्यात प्रत्यक्ष तेवढी रक्कम जमा होते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आयपीएलमध्ये खेळाडूंची पगाराच्या बाबतीत फसवणूक होत असल्याची तक्रार खेळाडूंच्या जागतिक संघटनेने केली आहे.

खेळाडूंच्या जागतिक संघटनेने आयपीएल आणि प्रिमीयर लिग मध्ये खेळणाऱ्या स्टार खेळाडूंचा पगार वाढविण्याची मागणी केली आहे. स्टार खेळाडूंसोबत १६ ते १७ कोटी रुपयांचा करार केला जातो. पण प्रत्यक्ष खेळाडूंच्या पगारावर एक अंश रक्कमच खर्च होते. आयपीएलच्या एकूण महसुलातील केवळ १७ टक्के रक्कम ही खेळाडूंच्या पगारावर खर्च होते तर प्रिमीयर लिगमध्ये ७१ टक्के रक्कम खेळाडूंच्या पगारावर खर्च होते. त्यामुळे आयपीएलमध्ये खेळाडूंना मिळणारा पगार एनएफएल आणि प्रिमीयर लिगमध्ये खेळाडूंना मिळणारा पगाराच्या तुलनेत खूपच कमी आहे. खेळाडूंना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आयपीएलमधील १० फ्रेंचायजींना बीसीसीआयकडून ४९० कोटी रुपये देण्यात येतात. यात एकूण कमाईतील ५० टक्के रक्कम बीसीसीआय ठेवते. तर तिकीट विक्री, प्रायोजकत्व आणि मर्चंडाईज विक्रीतून फ्रेंचायजीला ५० टक्के कमावता येतात. सरासरी ५०० कोटी रुपयांची कमाई फ्रेंचायजी करतात. पण त्यातील ९५ कोटी रुपये खेळाडूंच्या पगारासाठी ठेवले जातात. बेन स्टोक, विराट कोहली, रविंद्र जडेजा आदी खेळाडूंची कमाई १५ कोटींहून अधिक आहे. त्यातही सर्वांचे पगार इंडेक्स लिंक्ड आहेत. म्हणजे सामना गमावला की प्रत्येक खेळाडूच्या फीमधून २० टक्के रक्कम कापली जाते.

क्रिकेटपटूंचे भारतीय संघटन नाही
भारतात क्रिकेटपटूंचे संघटन नाही. त्यामुळे आयपीएलमध्ये जास्त वाटा उचलण्यासाठी खेळाडूंच्या बाजुने लढविण्यासाठी भारतात कुणीच नाही. अश्यात खेळाडूंच्या जागतिक संघटनेने हा मुद्दा उचलून धरला आहे. या संघटनेत इंग्लंड, अॉस्ट्रेलिया, वेस्टइंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे.

IPL Player Crore Contract Deals Payment Money


Previous Post

सर्वाधिक लोकप्रिय ‘होम मिनिस्टर’सह या मालिकेची वेळ बदलली.. अशा आहेत नव्या वेळा… हे आहे कारण (व्हिडिओ)

Next Post

ही विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर… १७ वर्षापासून सेवा… आता सर्व उड्डाणे स्थगित…

Next Post

ही विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर... १७ वर्षापासून सेवा... आता सर्व उड्डाणे स्थगित...

ताज्या बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केले हे ट्वीट

June 5, 2023

नाशिक – मुंबई महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; दोन जणांचा मृत्यू एक जण गंभीर जखमी

June 5, 2023

मुंबई विमानतळावर सहा कोटीचे १० किलो सोने केले जप्त, २ जण ताब्यात

June 5, 2023

पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगावला ॲक्सिस बँकेचे तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत चोरट्यांनी पळ काढला.

June 5, 2023

गंगा नदीवरील निर्माणाधीन पूल कोसळला… तब्बल १७०० कोटी पाण्यात… निकृष्ट दर्जाची पोलखोल

June 5, 2023
संग्रहित फोटो

शिंदे-फडणवीस सरकार आणि शिक्षण विभागाचा सावळागोंधळ; यंदापासून नवी आणि जुनी पाठ्यपुस्तके

June 5, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group