शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

झी मराठीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; ही नवी मालिका सुरू होणार

by India Darpan
ऑगस्ट 21, 2022 | 3:46 pm
in मनोरंजन
0
zee marathi

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी दूरचित्रवाहिनी असलेल्या झी मराठीवरुन एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच महिन्यात झी मराठीवर तब्बल ४ नव्या मालिका सुरू झाल्या आहेत. आता पुन्ही कुठली मालिका बंद होणार आणि कुठली नवी मालिका सुरू होणार, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

प्रेक्षकांची लाडकी सरस्वती म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे ही पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तितिक्षाने ‘सरस्वती’ मालिकेत सरस्वतीची भूमिका अत्यंत समरसून केली होती. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांनी या मालिकेसह तिला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले होते. आता तितिक्षा ‘झी मराठी’वरील वाहिनीवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून लवकरच ही मालिका सुरू होणार आहे.

अभिनेत्री तितिक्षा तावडे हे नाव मराठी मालिका, चित्रपट विश्वातलीत सर्वांना परिचयाचं आहे. नुकतीच ती क्रिकेटर मिताली राजच्या जीवनावर आधारित ‘शाब्बाश मिथू’ चित्रपटातही झळकली. आता लवकरच ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘झी मराठी’वर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका सुरू झाल्या. काही नव्या मालिकांसह जुने कलाकार पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करताना दिसत आहेत.

या चॅनेलवरील ‘देवमाणूस’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यापाठोपाठ त्याचा सिक्वेल ‘देवमाणूस २’ ही प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याच वेळेत आता ही नवी मालिका लागणार आहे. एकंदर प्रोमो पाहता अभिनेत्री तितिक्षा पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू या मालिकेत दाखवताना दिसते आहे. थोडीशी रहस्यमयी वाटणाऱ्या या मालिकेत तितिक्षा ही नेत्राची भूमिका करत आहे.

ती बोलते ते घडत नाही… जे घडणार आहे ते ती बोलते.

नवी मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी'
१२ सप्टेंबरपासून,
सोम ते शनि, रात्री १०.३० वा. #SatvyaMulichiSataviMulagi #ZeeMarathi pic.twitter.com/ZZTM4gpQtV

— Zee Marathi (@zeemarathi) August 18, 2022

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ असलेल्या नेत्राला भविष्य दिसते. ती बोलते ते सत्य होत. मात्र ती काळ्या जिभेची म्हणून गावकरी तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात. त्यावेळी पुजारी सांगतात, ती बोलते ते खरे होत नाही तर जे होणार आहे ते ती बोलते. मात्र यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरे जावे लागते. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर आयरिस प्रॉडक्शनने या मालिकेची निर्मिती केली आहे. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका १२ सप्टेंबर पासून रात्री १०.३० वाजता पाहायला मिळणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि प्रमुख भूमिकेत तितिक्षाला पाहून तिच्या चाहत्यांना आनंद झालेला दिसत आहे. सर्वजण तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

Zee Marathi TV Channel New Serial Coming Soon
Entertainment TV Serial Devmanus2
Satvya Mulichi Satavi Mulgi

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयकर विभागाच्या निशाण्यावर आता हॉस्पिटल्स; याची होणार चौकशी

Next Post

पेटीएमची सॅमसंग स्टोअर्ससह भागीदारी; मिळणार ही सुविधा

Next Post
P4B POS InstoreShoot UCB 364G BG Dark e1661079599745

पेटीएमची सॅमसंग स्टोअर्ससह भागीदारी; मिळणार ही सुविधा

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011