बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘झी मराठी’वरील सलग दुसरी मालिका होणार बंद (व्हिडिओ)

by India Darpan
जुलै 19, 2023 | 5:06 am
in मनोरंजन
0
Capture 17

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चांगल्या मालिकांना टीआरपीचा फटका बसतो, हे आपण नेहमीच पाहतो. याचाच फटका बसून अनेक चांगल्या मालिका बंद होतात. असाच फटका बसल्याने ‘झी मराठी’वरील ‘लोकमान्य’ ही मालिका बंद होणार असल्याची बातमी आली होती. त्यापाठोपाठ आता आणखी एक मालिका बंद होणार असल्याची माहिती मिळते आहे.

छोट्या पडद्यावरील मालिका या घरोघरी अत्यंत आवडीने पाहिल्या जातात. त्यामुळेच या वाहिन्यांमध्ये कायम स्पर्धा सुरू असते. त्यातही झी मराठी विषयांच्या वेगळेपणामुळे तिचं पारडं कायमच थोडं जड असे. कालांतराने वाहिन्या वाढल्या. त्यामुळे गेली काही वर्ष झी मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कमी पडताना दिसते. नव्या मालिकांसाठी जुन्या मालिका एकापाठोपाठ एक प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच झी मराठीवरील ‘लोकमान्य’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची बातमी आली होती. आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

झी मराठीवर लवकरच नवीन मालिका येऊ घातल्या आहेत. यातील काही मालिकांचे प्रोमो नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहेत. या नवीन मालिकांसाठी जुन्या मालिका संपवण्यात येणार आहेत. कमी टीआरपीमुळे या मालिका बंद होणार आहेत. ‘लोकमान्य’ नंतर ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेली ‘३६ गुणी जोडी’ आता रंजक वळणावर पोहोचली होती. तरीही केवळ टीआरपी नसल्याने ती बंद होणार आहे. तर तिच्या जागी दुसरी मालिका ‘सारं काही तिच्यासाठी’ दाखवण्यात येणार आहे. दोन सख्ख्या बहिणींच्या नात्यावर आधारलेली ही मालिका आहे. २० वर्षांपूर्वी त्यांची ताटातूट कशी होते आणि पुढे त्यांचं नातं कसं सांधलं जातं हे या मालिकेत दाखवण्यात येणार आहे. प्रोमो पाहून तरी प्रेक्षक या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहेत.

‘३६ गुणी जोडी’ या मालिकेच्या टाइम स्लॉटवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. आणि या मालिकेच्या जागी म्हणजे ७ वाजता ‘सारं काही तुझ्यासाठी’ दाखवण्यात येणार आहे.

अंतर आलं तरी तुटत नाहीत रक्तांची नाती,
नवी मालिका 'सारं काही तिच्यासाठी'….

21 ऑगस्टपासून,
सोम ते शनि, 7 PM #SaraKahiTichyasathi #ZeeMarathi #NewSerial #Promo pic.twitter.com/T8aOXu5JuR

— Zee Marathi (@zeemarathi) July 15, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अधिकमास पुरुषोत्तम महिना कसा झाला? अशी आहे कहाणी गुणसुंदरीची!

Next Post

मुकेश अंबानींच्या रिलायन्सचा डोळा आलिया भट्टच्या कंपनीवर.. इतक्या कोटींची डील?

India Darpan

Next Post
Alia Bhatt 1 e1689688612328

मुकेश अंबानींच्या रिलायन्सचा डोळा आलिया भट्टच्या कंपनीवर.. इतक्या कोटींची डील?

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011