सिद्धी दाभाडे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर असलेला युवराज सिंग आता बाबा झाला असून त्याने ही गोड बातमी सोशल मीडियातून आपल्या चाहत्यांना शेअर केली आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर युवराज सध्या सोशल मीडियात चांगलाच सक्रिय असतो. याच माध्यमाचा वापर करत त्याने म्हटले आहे की, आमच्या सर्व चाहते, कुटुंब आणि मित्रांसाठी. आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आम्हाला पुत्ररत्न मिळाले आहे. या आशीर्वादासाठी आम्ही देवाचे आभार मानतो आणि आशा करतो की आमच्या गोपनीयतेचा आदर केला जाईल.
२००७ T20 विश्वचषक आणि २०११ विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा भाग असलेल्या युवीने भारतासाठी ४० कसोटी, ३०४ एकदिवसीय आणि ५८ T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. युवराजने १० जून २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तर, त्याची पत्नी हेजल कीच एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हेजल कीच बॉडीगार्ड या चित्रपटात सलमान खान आणि करीना कपूरसोबत दिसली होती. आमिर खानची मुलगी इरा खान हिने दिग्दर्शित केलेल्या ‘युरिपीड्स मेडिया’ या नाटकातही तीने काम केले होते. याशिवाय ती २०१३ च्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनमध्येही सहभागी होती. काही काळ डेट केल्यानंतर युवराज आणि हेजलने नोव्हेंबर २०१६ मध्ये लग्न केले. युवराज आणि हेजलने शीख आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले. गुरुद्वारामध्ये लग्न केल्यानंतर दोघांनी गोव्यात डेस्टिनेशन वेडिंगही केलं होतं.
या जोडप्याने चांगली बातमी शेअर करताच, चाहत्यांनी कमेंट सेक्शन मध्ये अभिनंदन संदेशांचा वर्षाव केला. त्यांच्या पाठोपाठ बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. आयुषमान खुरानाने केमेंट सेक्शन मध्ये ‘❤️’ इमोजी टाकला, तर बिपाशा बसूने ‘अभिनंदन ❤️????’ लिहून पोस्ट केले. ”युवी आणि हेजलचे अभिनंदन. तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️❤️” असे प्रीती झिंटाने जोडले. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने लिहिले, “खूप अभिनंदन भाऊ. मला खात्री आहे की तू एक अद्भुत पिता होशील. लहानाला खूप प्रेम. भाभींना शुभेच्छा.” अभिनेत्री प्रग्या कपूरने लिहिले, “अभिनंदन!!! किती छान बातमी असे लिहले आहे.
@hazelkeechofficial @yuvisofficial”.