नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार संजय राऊत हे दररोज सकाळी पत्रकार परिषद घेतात, विविध नेत्यांवर आरोप करतात. त्यामुळे त्यांना सत्ताधारी पक्ष आणि अन्य नेतेही गांभिर्याने घेत नाहीत. त्यांना आवरण्याची गरज आहे, असे मत अनेकदा व्यक्त केले जाते. यासंदर्भात आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होत असल्याचे बोलले जाते. त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे ठाकरे गटातही नाराजी व्यक्त केली जाते. त्यावर आता ठाकरे गटाचे आमदार तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकारांशी संवाद साधला आहे.
ठाकरे गटाचे तथा शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांच्या चिरंजीवाच्या लग्नाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आदींचा त्यात समावेश आहे. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या आमदार किंवा पदाधिकाऱ्यांना आक्षेप असेल त्यांनी त्यांची मते आमच्याकडे मांडावीत, आम्ही लोकशाही पाळतो. ज्या अर्थी आमचे पदाधिकारी माध्यमांकडे मन मोकळे करतात त्या अर्थी आमच्याकडे लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे, असे सांगत आदित्य यांनी भाजपचे नाव न घेता टोला लगावला.
मते असू शकतात
महाविकास आघाडीत मतभेद असल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, तीन वेगळे पक्ष एकत्र येतो तेव्हा आम्ही सगळेच एका मताचे नसतो. काहीवेळा काहींची मते वेगवेगळी असू शकतात. आणि ती मत व्यक्त करणे म्हणजेच लोकशाही साजरी करणे. वाद-विवाद म्हणजे टोकाची भांडण नव्हे, मत व्यक्त होणं गरजेचं आहे. देशात विविध राज्य आहेत, भाषा आहेत, धर्म, जाती आहेत. या सर्वांचा मिळून देश आहे. हेच साजरं करून आपल्याला संविधान जपायचं आहे, असे आदित्य यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1656942570524782594?s=20
Yuva Sena Chief Aditya Thackeray on Sanjay Raut