मुंबई – सर्वसामान्य माणूस आधीच महागाईने त्रस्त असतानाच इंधनांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल वाहनांना घराबाहेर काढण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागतो. त्यामुळे अनेक वाहनधारकांचा कल आता इलेक्ट्रिक वाहन घेण्याकडे वाढला आहेत. इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) वाढती मागणी पाहता अनेक नवनवीन परदेशी कंपन्याही भारतात दाखल होत आहेत. तथापि, मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक कार खरेदी करणे अजूनही बजेट बाहेर असून खूप महाग पडत आहे. देशातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सन EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 14 लाख रुपये आहे. अशा परिस्थितीत, नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याऐवजी तुमच्या जुन्या पेट्रोल किंवा डिझेल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करू शकता. फक्त त्याकरिता काही गोष्टी कराव्या लागतील.
इलेक्ट्रिक वाहनांचे भाग बनवणाऱ्या अनेक कंपन्या जुन्या पेट्रोल-डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्यासाठी काम करत आहेत. बहुतेक कंपन्या कंपन्या कोणत्याही पेट्रोल किंवा डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करतात. कारण कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक किट जवळजवळ सारख्याच असतात. तथापि, श्रेणी व शक्ती वाढवण्यासाठी बॅटरी आणि मोटरमध्ये फरक असू शकतो. याकरिता आपण या कंपन्यांशी त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे संपर्क साधू शकता.
कोणत्याही कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर करण्यासाठी मोटर, कंट्रोलर, रोलर आणि बॅटरीचा वापर केला जातो. कारला इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित करण्याची किंमत किती किलोवॅट (केडब्ल्यू) बॅटरी आणि किती किलोवॅट मोटर बसवायची यावर अवलंबून असते. कारण हे दोन्ही भाग कारच्या पॉवर आणि ड्रायव्हिंग रेंजवर अवलंबून असतात.
पेट्रोल-डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतर होते, तेव्हा सर्व जुने यांत्रिक भाग बदलले जातात. म्हणजेच, कारचे इंजिन, इंधन टाकी, इंजिनशी केबल आणि इतर भागांसह एअर कंडिशनचे कनेक्शन देखील बदलले जाते हे काम पूर्ण करण्यासाठी किमान सात दिवस लागतात. सर्व भाग कारच्या बोनेटखाली बसवले जातात. इंधन टाकी काढून टाकल्यानंतर, त्याच्या कॅपवर चार्जिंग पॉइंट बसवला जातो. मात्र कारच्या मॉडेलमध्ये कोणताही बदल नाही.
आपल्या पेट्रोल किंवा डिझेल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रूपांतरित करण्यासाठी 5 लाख रुपये खर्च करावे लागतील. पण हे पैसे तुम्ही 5 वर्षांपेक्षा कमी वेळात वसूल कराल. फक्त चार्जिंगवर दरमहा फक्त 1120 रुपये खर्च करावे लागतील. तर सध्या पेट्रोलवर होणारा मासिक खर्च 10,090 रुपये आहे. मात्र इलेक्ट्रिक कार 75 किमी पर्यंतची रेंज देते.
पेट्रोल किंवा डिझेल कारचे इलेक्ट्रिक कारमध्ये संपातर करणाऱ्या कंपन्या 5 वर्षांची वॉरंटीही देतात. कारमध्ये वापरलेल्या किटवर कोणताही अतिरिक्त खर्च होणार नाही. यासोबत कंपनी बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटी देखील देते. कंपनी किट आणि सर्व भागांसाठी वॉरंटी प्रमाणपत्र देखील प्रदान करते. त्याला सरकार आणि आरटीओने मान्यता दिली आहे.