India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लिव्हप्युअरने लॉन्च केली एअर कंडिशनरसह ही उपकरणे

India Darpan by India Darpan
September 29, 2021
in वाणिज्य
0
लिव्हप्युअरने लॉन्च केली एअर कंडिशनरसह ही उपकरणे
0
SHARES
56
VIEWS
WhatAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई – वॉटर प्युरिफायर्स, एअर कंडिशनर आणि स्लीप आणि वेलनेस सोल्युशन्सच्या नाविन्यपूर्ण उत्पादनातील अग्रगण्य ‘लिव्हप्युअर’ने नुकतीच नवीन उत्पादन श्रेणी लॉन्च केली आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्या ग्राहकांचे जीवन सुलभ करण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी या ब्रँडने एसीपासून वॉटर प्युरिफायर्सपर्यंत अनेक स्मार्ट घरगुती उपकरणे बाजारात दाखल केली आहेत.

लिव्हप्युअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रितेश तलवार म्हणाले, “लिव्हप्युअरमध्येआम्ही हे जाणतो की, आमचे ग्राहक पूर्वीपेक्षा जास्त वेळ घरी घालवत आहेत. त्यांच्या दैनंदिन वाढत्या गरजा लक्षात घेत, आम्ही सुपर-स्मार्ट तंत्रज्ञानाधारित घरगुती उपकरणांची विस्तृत श्रेणी लॉन्च केली आहे. हे तंत्रज्ञान दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सहजसोप्या करेल. घरामध्येच आरामदायी दिवस घालवता येईल सोबत पिण्याचे गरम पाणी ही मिळेल. आम्हाला विश्वास आहे की, ही उत्पादने आमच्या ग्राहकांच्या जीवनशैलीत भर घालतील, आणि प्रत्येक दिवस अधिक सुविधाजनक देखील करतील.”

स्प्लिट एसी १.५ टी विथ स्मार्ट इन्व्हर्टर
हेका या स्मार्ट परिणामकारक तंत्रज्ञानासह लिव्हप्युअरने ५ स्टार रेटिंगचा एसी तयार केला आहे, जो तुमच्या गरजेनुसार तीन मोडमध्ये थंडपणाची अनुभूती देईल. हेका मोड ऊर्जेच्या योग्य वापरासह aआराम देईल. मॅजिक मोड समाधान मिळवून देईल तर ग्रीन मोड ऊर्जा कार्यक्षमता सुनिश्चित करेल. या अद्ययावत वैशिष्ट्यांसह आपण आपल्या बिलावर ४०% पर्यंत वीज बचत करू शकता. ॲमेझॉन अलेक्सा आणि गुगल होमच्या माध्यमातून वापरकर्त्यांना त्यांच्या एसीवर सहजपणे नियंत्रण ठेवता येते. विशेष म्हणजे बिघाड झाल्यास हे स्वतःच निदान करुन त्याची वापरकर्त्यांना सूचना ही देते. जिओफेन्सिंगच्या मदतीने हा एसी तुमच्या फोनच्या लोकेशन अनुसार चालू किंवा बंदही होईल. याची किंमत – ३९,५९९ रु. आहे.

स्प्लिट एसी १.६ टी विथ स्मार्ट इन्व्हर्टर
हेका स्मार्ट तंत्राज्ञानाआधारित ३ स्टार १.६ टी स्मार्ट इन्व्हर्टर एसी आजूबाजूच्या तापमानानुसार अनेक कस्टमाइझ्ड मोड्समध्ये स्वतः परिवर्तीत होतो. खोलीतील तापमानासोबत अनुकूल होत, हा एसी ४०% पर्यंत ऊर्जा बचत करतो. त्याचे ईजीएपीए फिल्टर चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध हवा प्रदान करते आणि एको-फ्रेंडली रिफ्रिजरेन्ट ओझोन थर कमी करते, पर्यावरणाचे संरक्षण करते. याचे आणखी एक विलक्षण वैशिष्ट्ये म्हणजे आपण एसीजवळ जाताच तो आपोआप कार्यान्वीत होतो. आवाज नियंत्रण प्रणालीद्वारे हा एसी स्वयंचलित होतो. याची किंमत ३५,९९९ रु. आहे.

झिंगर कॉपर हॉट
गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की चांगले पचन होण्यासाठी, सजलीकरण (हायड्रेशन), रक्ताभिसरण आणि मध्यवर्ती मज्जासंस्था कार्यरत ठेवण्यासाठी. तांब्याच्या अंगभूतगुणांसह लिव्हप्युअरच्या खास कॉपर कार्ट्रिज आणि ६ टप्प्यांच्या फिल्टरेशनसह हे सर्व फायदे मिळतात. झिंगर कॉपर हॉटसह, आपल्याला आरओ+यूएफ+यूव्ही शुद्धीकरण मिळते, तर यातील टँकचे यूव्हीमुळे निर्जंतुकीकरण होते आणि जवळपास २०,००० लिटर पाण्याची बचत होते. याची किंमत २१,७७० रु. आहे.

Previous Post

विशेष लेखमाला – पितृपक्ष महात्म्य – खीर-पुरीच का करतात?

Next Post

आपल्या जुन्या कारला बनवा इलेक्ट्रिक; फक्त हे करा…

Next Post
तुम्ही इलेक्ट्रिक वाहन घेताय का? सर्वप्रथम हे वाचा…

आपल्या जुन्या कारला बनवा इलेक्ट्रिक; फक्त हे करा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग

लागा कामाला ! महापालिका निवडणूक आरक्षण सोडत या तारखेला

May 23, 2022
चालबाज चीनचा हा डाव उघड

चीनची ऑडिओ क्लीप व्हायरल; असा रचला आहे मोठा कट

May 23, 2022
कोरोना आणि सोशल मिडिया

चिंताजनक! कोरोनामुळे दर ३३ तासांनी १० लाख नागरिक होताय अत्यंत गरीब; महागाईचा भडका वाढला

May 23, 2022
हसण्याच्या पद्धतीवरूनही स्वभाव कळतो? कसं काय?

इंडिया दर्पण – हास्य षटकार – भिकारी आणि शेठजी

May 23, 2022
….आता रोजचे वाढदिवसही कळेल

आज आहेत या मान्यवरांचे वाढदिवस – २४ मे २०२२

May 23, 2022
आजचे राशिभविष्य – शनिवार – १७ जुलै २०२१

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस वाचा, २४ मे चे राशिभविष्य

May 23, 2022
  • Home
  • Home New
  • Sample Page

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group