मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – योगगुरू बाबा रामदेव यांना जोरदार व्यावसायिक दणका बसला आहे. नियमांचे पालन केल्यामुळे शेअर बाजारने त्यांच्या पतंजली फूड्स कंपनीमधील २९.२५ कोटी शेअर्स गोठविले आहेत.
पतंजली आयुर्वेदाची सब्सिडियरी असलेल्या पतंजली फूड्सच्या स्टॉकमध्ये आज घसरण होत आहे. पतंजली फूड्सच्या शेअरवर पाच टक्क्यांचे लोअर सर्किट लावण्यात आले. आता व्यवस्थापनाच्या वक्तव्यानंतर आणि बाजारातील रिकव्हरीनंतर या शेअरमध्येही थोडी रिकव्हरी होत असल्याचं दिसून येत आहे. एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती देताना कंपनीने म्हटले आहे की, २९.२५ कोटी शेअर्स फ्रीज करण्यात आले आहेत. ही कारवाई फक्त पतंजली फूड्सवरच नाही तर इतर २० कंपन्यांवरही करण्यात आली आहे.
सार्वजनिक शेअर होल्डिंगचे नियम न पाळल्यानं या सर्व कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सेबीच्या नियमानुसार लिस्टेड कंपन्यांची २५ टक्के भागीदारी ही पब्लिक शेअर होल्डर्सकडे असायला हवी. तर पतंजली फूड्सने २०२२ सप्टेंबरपर्यंत आपल्या शेअर्समधील १९.१८ टक्के भाग हा पब्लिक शेअर होल्डर्सकडे दिला. त्यांनी नियमाचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली.
पतंजली समूहात ३४ कंपन्या
पतंजली समूहात ३४ कंपन्या आहेत. पण एवढ्या मोठ्या पसाऱ्यात बाबा कुठेही नाहीत. निदान कागदावर तरी तसे दाखवले जाते. त्यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे सहकारी आचार्य बाळकृष्णा हे पतंजलीचे सर्वेसर्वा आहेत. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत बाळकृष्णा यांचा क्रमांक आहे. त्यांच्याकडे २५ हजार ६०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती पुढे आली आहे.
Yog Guru Baba Ramdev 29 Crore Share Freeze