बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांचा इतक्या मताधिक्याने विजय…दिली ही प्रतिक्रिया

by India Darpan
नोव्हेंबर 23, 2024 | 5:38 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20241123 WA0716 1

येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- येवला लासलगाव मतदारसंघातील नागरिकांनी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने कौल दिला आहे. तसेच विकासाला आड येणाऱ्यांना येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे हा विजय येवला मतदारसंघातील नागरिकांच्या कष्टाचा आणि घामाचा विजय असून मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो असे प्रतिपादन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून २६ हजार ४०० मतांनी विजयी झाल्यानंतर येवला संपर्क कार्यालय परिसरात ढोल ताशांचा गजर, गुलाल उधळत,फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित जनसमुदायाचे आभार मानले. यावेळी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि प्रचार प्रमुख अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,डी.के.जगताप, पंढरीनाथ थोरे,हुसेन शेख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थितीत होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की,येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात आपण विकासाला प्राधान्य दिले.आपण केवळ विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली. आपण जातीवाद पुढे करून निवडणूक लढवली नाही. मात्र काही लोकांनी या मतदारसंघात जातीपातीचे विष पसरविण्याचे काम केले. मात्र येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांच्या जातीपातीच्या दादागिरीला थारा न देता विकासाला कौल दिला. त्यामुळे हा विजय या मतदारसंघातील गोरगरीब कष्टकरी जनतेचा विजय आहे. येवला लासलगाव मतदारसंघातील जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास म्हणजे जातीवादाला चपराक असून मी सर्वांचे आभार मानतो असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, मतदारसंघात विकास करतांना आपण कुठल्याही जातीपातीचा विचार केला नाही. विकास हे एकमेव धेय्य आपण नेहमीच ठेवले. मात्र काही लोकांनी जातीच विष पेरल्याने काही लोक जातीपातीच्या राजकारणाला बळी पडले. त्यामुळे काही मते आपली कमी झाली. असे असले तरी मतदारसंघातील जनता ही जातीय वादाला खत पाणी घालू इच्छित नाही हे स्पष्ट झाले आहे. सर्व जातीधर्माच्या बांधवांनी कष्ट घेतले. ओबीसी,एसटी एसीसह,मुस्लीम अल्पसंख्यांक, मराठा सर्व समाज बांधवांनी आपल्याला पाठींबा दिला. आपल्या विजयात या सर्व समाज बांधवांचे विशेष योगदान आहे. विशेषतः अनेक मराठा बांधव विरोध पत्कारून माझ्या विकासाच्या पाठीशी उभे राहिले या सर्वांचा मी मन:पूर्वक आभारी असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, आपला हा महाराष्ट्र छत्रपती,शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात जातीपातीला थारा आजीबात दिला जात नाही. त्यामुळे सर्व लोक आपल्यापाठीशी एकनिष्ठपणे उभे राहिले.हा छत्रपती,शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र पुरोगामी होता आणि तो पुरोगामी राहणार हे जनतेने आजच्या निकालातून दाखवून दिलं असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड विधानसभा मतदार संघात भाजपचे डॅा. राहुल आहेर विजयी…बघा कोणाला किती मते पडली

Next Post

नांदगावच्या जनतेने दिलेला कौल स्विकारतो, पुन्हा नव्या जोमाने लढू…समीर भुजबळ

Next Post
sameer bhujbal

नांदगावच्या जनतेने दिलेला कौल स्विकारतो, पुन्हा नव्या जोमाने लढू...समीर भुजबळ

ताज्या बातम्या

01 Sanay Raut Saheb New scaled e1659327045274

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011