नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येवला तालुक्यातील चिचोंडी गावचे भूमिपुत्र भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर नारायण मढवई यांना देशसेवेचे कर्तव्य बजावत असतांना वीरमरण आले आहे. यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, ही वार्ता ऐकून अतिशय दुःख झाले. शेतकरी कुटुंबातून पुढे येत सैन्यदलात भरती झालेले नारायण मढवई यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ठ अशी कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या निधनाने मढवई कुटुंबासोबतच संपूर्ण तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय शहीद मेजर नारायण मढवई यांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असे भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.