सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सतत वर्दळ असलेली जागा व येथील बसस्थानकासमोरील कमला मार्केट संकुलातील अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन पहाटेच्या सुमारास चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्याचा हा प्रयत्न फसला. चोरटा शिताफीने पोलिसांच्या जाळ्यात अडकला. चेतन बाळू असळक (२२, रा. पंचाळे, ता. सिन्नर) असे संशवित चोरट्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्सिस बँकेची कमला मार्केट या कमर्शियल इमारतीत एटीएम सेवा आहे. संशयित चोरटा असळकने एटीएमशी छेडछाड करताच बँकेच्या मुंबई येथील मुख्य शाखेत अलार्म अर्थातच धोक्याची घंटा वाजली. मुंबईहून अधिकाऱ्याने तत्काळ सिन्नर पोलिस ठाण्यास याबाबत माहिती दिली. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार पोलीस नाईक श्रीकांत गारुंगे, मदतनीस प्रमोद भोये व जुंद्रे यांनी तातडीने कमला मार्केट येथे धाव घेतली.
पोलिसांची चाहूल लागताच चोरट्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांनी त्याला पकडले. अलार्म सिस्टीम व पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. एटीएमची देखभाल करणाऱ्या अद्वैत कंपनीचे सल्लागार अॅड. संतोष मिननाथ झाडे (३६) यांच्या फिर्यादीवरुन सिन्नर पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी असळक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार पवार पुढील तपास करीत आहेत… मागील काही महिन्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता. या एटीएममध्ये सुमारे ९ लाख रुपयांची रोकड होती. बँकेने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन सावधगिरी बाळगलेली नसती तर ही मोठी रक्कम चोरट्याच्या हाती लागली असती आणि मोठा आर्थिक फटका बसला असता, अशी माहिती पोलिसांनी दिली मागील महिन्यातह. एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला होता