येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात रात्रीच्या सुमारास ठाणगाव येथे नायलॅान मांज्याने रामदास हरिभाऊ गरडे हे गंभीर जखमी झाले. गरडे हे दुचाकीवरुन घरी जात होते. तेव्हा त्यांच्या गळ्याला नायलॉन मांज्या घासून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत एका व्यक्तीने जवळच असलेल्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. काही दिवसापूर्वीच येवल्यात मोठ्या प्रमाणावर नायलॅान मांजा पकडण्यात आल्यानंतर सुध्दा शहरात नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा समोर आले आहे.